Thursday, 18 July 2019

जिंदगी...

जिंदगी...
ज़िन्दगी मैंने तेरा साथ दिया
और जाना
तू हैं तो बड़ी हसीन 
मगर
तु हर किसी के बस की बात नही
बस इतना समझ ले के
हर कोई तुम्हारे काबिल नही
और तू भी
किसी किसी के लायक नही।
--सुनिल पवार..✍️

Monday, 15 July 2019

रंग पावसाचा..

रंग पावसाचा..

रंगहीन,गंधहीन
पाऊस
पाणी पाणी
परी रंग
त्याचा वेगळा..
कधी
नटवतो निसर्गाला
तर कधी
ओरबाडतो सगळा..!!
--सुनिल पवार...✍️

एकांताचा हात धरून..

एकांताचा हात धरून..

बऱ्याच दिवसांनी
रस्ता शांत दिसतोय..
आपल्याच विश्वात
एकांतात रमलेला दिसतोय.!!

कुणी सोबत नाही
कुणाची संगत नाही
मार्ग अगदीच सरळ
कसले वळण नाही..!!

म्हणूनच मी ही चाललोय
एकला चलो रे म्हणत
त्याच रस्त्यावरून..
एकांताचा हात धरून..!!
--सुनिल पवार...✍️

Sunday, 14 July 2019

मग उरणार काय..

मग उरणार काय..
आभाळ तेव्हाच फाटते
जेव्हा गलबलून येते
पण कोणी
भिजत नाही त्यात
अस नाही की
काही रुजत नाही त्यात
पण म्हणतात ना
कोण पडतंय फंदात
वाहून जाईल सर्वच
मग उरणार काय कवनात..!!
--सुनिल पवार...✍️
अस नाही की
काही रुजत नाही त्यात
पण म्हणतात ना
कोण पडतंय फंदात
वाहून जाईल सर्वच
मग उरणार काय कवनात..!!
--सुनिल पवार...✍️

कुछ लोग...

कुछ लोग...
कुछ लोग
अपनापन जताते है
पर होते नही..
पास होकर भी वो
दूर दूर लगते है।
कुछ लोग
पराये होकर भी
अपनो सा बर्ताव करते है
और कुछ लोग
अपने होकर भी
मन को घाव देते है।
कुछ लोग
हा कुछ लोग
अब तुम ही सोचो
तुम्हे किस लोगों में रहना है?
खैर छोड़ो
मैंने तो कुछ लोगों की बात की है।
--सुनिल पवार...✍️

पाठलाग...

पाठलाग..

पाठलाग
मी करतोय की आठवणी
काही कळत नाही!
आणि आठवणीशिवाय 
एकही दिवस ढळत नाही!!

दिवस काय
पण आता रात्रही सरता सरत नाही
अविरत चालू आहे पाठलाग
तो संपता संपत नाही.
आणि हृदयावरचे 
निशेचे साम्राज्य मिटता मिटत नाही..!!
--सुनिल पवार...✍️

|| पावसाची गाणी ||

|| पावसाची गाणी ||
===========
म्हटलं तर पाऊस,
म्हटलं तर पाणी..
भरलेल्या आभाळाची
समजून घे तू वाणी..!!
किती घालशील बांध
किती अडवशी पाणी..
तरी ओघळतो थेंब
घेता मिटून पापणी..!!
देता चाहूल क्षणाची
विचलित तू विराणी..
कसे ठरेल पाऊल
बरसता तो अंगणी..!!
वारा चंचल गंधित
वार्ता सांगे कानोकानी..
अंतरात लपलेली
लख्ख दिसे सौदामिनी..!!
मिटणार ना कधीही
काळजावरील लेणी..
युगायुगांची कहाणी
गाती पावसाची गाणी..!!
--सुनिल पवार...✍🏽
भारत जगताप, Pratiksha Kurhade and 17 others
15 Comments
97 Shares
Like
Comment
Share

पाऊस पडतो शहरात..

पाऊस पडतो शहरात..
पाऊस पडतो शहरात
मग नवीन काय त्यात..?
रस्ते जातात खड्यात
अन् ऋतू संपतो बुजवण्यात..!!
पाऊस पडतो बंगल्यात
अर्धा जातो पिण्या पोहण्यात..
अन् अर्धा अंघोळ,चूळ भरण्यात
पाऊस वाहतो सांडपाण्यात..!!
पाऊस पडतो झोपडीत
जणू लाथ बसते पेकाटात..
वाहून जाते किडुक मिडुक
अन् हयात जाते कवळण्यात..!!
पाऊस पडतो बातम्यात
तो रमतो Trp खेचण्यात..
चघळला जातो घराघरात
पाऊस असतो मुखामुखात..!!
पाऊस पडतो,पाऊस उडतो
कोणी हर्षितो,कोणी रडतो..
पण रंक असो वा राव कुणीही
पावसावर प्रत्येकाचा जीव जडतो..!!
--सुनिल पवार...✍️
588
People Reached
30
Engagements
22
5 Comments
2 Shares
Like
Comment
Share