Tuesday, 30 August 2016

II खबर खोद के II (स्कर्ट)



===========
II खबर खोद के II
===========
ते म्हणाले,
धार्मिक ठिकाणी पर्यटकांनी,
स्कर्ट घालून फिरू नका..
आमच्या संस्कृतीचे तुम्ही
अवमूल्यन करू नका..!!

आम्ही म्हणतो,
अवमूल्यन झाले विचारांचे
त्याचे मूल्य जरा वाढवा..
दोष हा नजरेचा आहे
त्यावर आधी स्कर्ट चढवा..!!
******$p.......

Monday, 29 August 2016

|| आरसा ||

आरसा...
पुरे कर आता
येता जाता आरसा दाखवणे,
कारण मी कळलोय माझा मला
तुझ्या उक्तीतुन, कृतीतून
आणि तू दाखवलेल्या
प्रत्येक आरशातून।
पण एक विचारू तुला?
त्या आरशात
तू का पाहात नाही कधी?
एकदा बघचं
मग समजेल तुला
बाकी काही दिसेल न दिसेल
पण निदान
जमलेली धूळ तरी साफ होईल।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'पुरे कर आता येता जाता आरसा दाखवणे, कारण मी कळलोय माझा मला तुझ्या उक्तीतुन, कृतीतून आणि तू दाखवलेल्या प्रत्येक आरशातून| आरता पण एक विचारू तुला? त्या आरशात तू का पाहात नाही कधी? एकदा बघचं मग समजेल तुला बाकी काही दिसेल न दिसेल पण निदान जमलेली धूळ तरी साफ होईल| सुनील पवार..'

|| स्वयंप्रकाशित तारे ||

|| स्वयंप्रकाशित तारे ||
==============
त्यांच्या डोळ्यातील स्वप्न
सत्यात उतरून यावे..
समजतात ते सारेच
थोडे आपण समजून घ्यावे...!!

ह्या विशाल आकाशातील
ते स्वयंप्रकाशित तारे..
निखळणार ना अवकाळी
याची काळजी घ्या हो सारे..!!
मूक बधिर असले जरी
त्यांची आकलन शक्ती भारी..
उणिवांवर करतील मात
घेतील आकाशी भरारी..!!
****सुनिल पवार.....✍🏽

|| जरासे ||

|| जरासे ||
=======
आठवणीचे द्वार
किलकिले जरासे..
धुंद स्मृतीचे कवडसे
प्रकाशीत जरासे..!!
ओंजळीत घेतले
निसटले कण वाळुचे..
नयन ओले कातरसे
अन
गहिवरले मन जरासे..!!
****$p.......

|| आजार ||

|| आजार ||
==========
शब्दांच्या
फाफट पसाऱ्यात
मी उगाच गुंतवितो
स्वतःला..
मी लिहतो
पोटतिडकीने
अन
उत येतो कथांना..!!

नका घालू पिंगा
शब्दांनो
भोवताली
जा,
परत फिरा
माघारी..
उपरी ठरेल
प्रतिभा तुमची
आम्हा
संकुचितांच्या
दारी..
तुमच्या वेदनेचं,
भावनेचं
ना सोयरसुतक
कोणास..
कोण घेईल
काळजी कोणाची.?
इथे,
जडलेला
एक आजार
प्रत्येक मनास..!!
***$p...✍🏽

Thursday, 25 August 2016

|| देवकी नंदना ||

|| देवकी नंदना ||
===========
देवकी नंदना,यशोदेच्या कान्हा
तू जन्मलास बंदिशाळेत
अन
लीलया तेथून निसटलास काय
लोक
बंदिशाळेच्या प्रेमात पडले
कंस,शिशुपाल,दुर्योधन, दुःशासन
ह्या ना त्या कारणाने
कारागृहास भेट देत आहेत
हातात हात गुंफुन,गळ्यात गळे घालून
राजरोस मुक्काम करत आहेत
बंदिशाळा ओसंडून वाहत आहे
फरक इतकाच
हे कोडगे निर्लज्ज लोक,
त्यास
आता जेलवारी म्हणतात..!!

तू एक पुतना मावशी काय मारलीस
पण गल्लीबोळात तिची पिल्लावळ
वळवळ करू लागली आहे..
जणू मागील जन्माचा सूड उगवतेय
नपुंसक साले
नासवू पाहताहेत देशाचं भविष्य
भेसळयुक्त दूध पाजून
वरून
हेच मायेचे नालायक पूत
त्यास
आता धंदा संबोधतात..!!
तू गोपिकांना आनंद दिला
राधेस प्रेम दिले
रुक्मिणेस विशेषाधिकार
सत्यभामेचा हट्ट पुरवला
द्रौपदीस बहीण मानले
राखी बांधून घेतली तिला वस्त्र पुरवले
मिरेस मोक्ष दिला
बंदिस्त स्त्रीयांसही सन्मान दिला
वर्णाव्या तरी किती
अशा अनंत तुझ्या लीला..
पण
आमच्या गोपाळांनी मात्र
अर्थाचा अनर्थ केला
छेडू लागले आया,बहिणीस
आड वाटेवर दबा धरून बसले
प्रसंगी,
जारासंघ, दुर्योधन,दुःशासन झाले
कधी प्रेमात भुलवून,कधी घात लावून
सर्वस्व लुटले,अत्याचार चालविले
अन
वर तोंड करून हेच लांडगे
त्यास मर्दुमुखी म्हणू लागले..!!
दरवर्षी तुझा जन्मोत्सव येतो
भक्तिभावे मी नतमस्तक होतो
तुझ्या लीलांचे गुणगानही गातो
पण कान्हा,
कळेना मज, तू नेमका कुठे असतो..?
ना घरात ना दारात,
ना दहीहंडीच्या कोणत्या थरात
ना विचारात, ना आचारात
नाही कोणत्या जन्मोत्सवात..
नेमका ह्याच संधीचा फायदा,
मी सुद्धा घेतो
अन
तुझ्या वाट्याचे प्रसादरूपी दही मीच फस्त करतो
कळत नाही कोणास, दिसतही नाही कोणास
माझ्यातील भक्त न जाणे कुठे लुप्त असतो
मात्र एक आहे
असा गोपाळकाला आता ठायी ठायी दिसतो..!!
|| जय श्री कृष्ण ||
****सुनिल पवार....

Wednesday, 24 August 2016

II उत्सव आणि उत्साह II

सन 2013 साली लिहलेला लेख त्यावेळी आमचे चिरंजीव केवळ 10 वर्षाचे होते..त्याची बोली अन माझी लेखणी यांनी साधलेला हा उत्सवी मेळ...
================
II उत्सव आणि उत्साह II
================
काल ऑफिस मधून घरी परतलो..पाऊल घरात टाकतो न टाकतो तोच मुलगा म्हणाला पप्पा आज ना आम्ही दहीहंडीचे चार थर कडक लावले..!
त्याचे कडक ऐकून मी तडक उडालो..पण मग स्वतःस सावरत त्याला विचारले
मी : कुठे गेला होता रे थर लावायला..??
मुलगा : ते भोगले काकांच मंडळ आहे ना त्यांच्या तिथे..(भोगले म्हणजे माझे मित्र दरवर्षी मुलांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या बिल्डींग जवळ दहीहंडीचे आयोजन करतात.)
मी : बर मग पुढे..
मुलगा : मग काय चार थर लावले ना कडक.. १०० रुपये बक्षीस मिळाले..
मी : मग पुढे..आणखी कुठे गेला होता..?
मुलगा : ते मी मराठी मंडळ आहे ना तिथे..(मी मराठी मंडळ आमच्या विभागात जवळच आहे)
मी : बर मग तिथे काय झाले..??
तिथे सुद्धा चार थर लावले एका झटक्यात..२०० रुपयाचे बक्षीस मिळाले..
मी : पण तुला सांगितले होते ना जास्त लांब जाऊ नको म्हणून..
मुलगा : पप्पा जास्त लांब कुठे, स्टेशन पर्यंतच तर गेलो होतो..तिथे शिवसेनेची दहीहंडी आहे ना शाखेजवळ तिथे..
मी जवळ जवळ किंचाळलोच काय स्टेशन पर्यंत..?
मुलगा : काय पप्पा तुम्ही पण..! स्टेशन तर इथे जवळच आहे.. तुमचे सगळे मित्र सुद्धा होते ना तिथे.. तिथून तर मी आरामात घरी येऊ शकतो..आणि हो..तिथे ना आम्ही पुन्हा चार थर लावले ३५० रुपये मिळाले.. पण पप्पा, आम्ही पाच थर लावले असते ना तर मस्त ट्रॉफी मिळाली असती..पुढच्या वेळी आम्ही पाच थर लावणार म्हणजे लावणारच..
मुलाचे प्रताप ऐकून मी जवळ जवळ उडालोच..आणि कडक ऐकून तर कडक व्हायची पाळी आली..पण मग स्वतःचे बालपणीचे दिवस आठवले..तोच अनुभव मी पुन्हा मुलाच्या रुपात अनुभवत होतो..फरक इतकाचं.. त्यावेळी आम्ही फक्त चाळीत आणि विभागातच हंडी फोडत होतो.. ती सुद्धा वर्गणी काढून....
पण आता मात्र ह्या उत्सवाचे रुपडेच पालटले आहे..आताचा उत्सव म्हणजे निव्वळ घोड्यांची रेस.. बक्षिसांसाठी शरीर रुपी घोडे जिंकण्याच्या लालसेने नुसते दामटवायचे..त्यांना ना जीवाची तमा ना सुरक्षेची काळजी..बस फक्त पळत राहायचे..मग जीव गेला तरी कोण करतोय तमा..?
मी म्हणतो हरकत नाही मुलांनी साहसी असायला..नव्हे ती असायलाच हवीत पण बेफिकीर मुळीच नसावे..कारण तुमची बेफिकिरी तुमच्या जीवावर बेतू शकते..नाही तशी बेतल्याची उदाहरणे सुद्धा आहेत..कालच आमच्या विभागातील दोन तरुण बाईक अपघातात मृत्युमुखी पडले..चटका लावणारी ही घटना..आई वडिलांनी स्वप्न बांधून मुलांना लहानाचे मोठे करावे..आणि अपेक्षा पुर्तीची वेळ येताक्षणी काळाने घाला घालून त्या स्वप्नांचा चक्काचूर करावा..ह्या पेक्षा दुर्दैव ते काय..? तो हृदय पिळवटणारा आकांत अजूनही डोळ्यासमोर तरळतो आहे..सण सरतो..उत्साह मावळतो..मागे उरतो फक्त आकांत..
शेवटी इतकंच सांगू इच्छितो की सण साजरे करा..उत्साह ओसंडून वाहू द्या पण प्रत्येकांनी स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्या..सुरक्षेच महत्व जाणून घ्या आयुष्य सुंदर आहे त्यास कृतीने आणखी सुंदर करा..
जय महाराष्ट्र..
आपलाच,
चकोर...
|| श्री कृष्ण जयंतीच्या तसेच गोपाळकालाच्या हार्दिक शभेच्छां ||

|| खबर खोद के || (टोल माफी)

|| खबर खोद के ||
===========
कोकणचो स्वाभिमान
गर्जूक लागला
चाकरमान्याक टोल माफी
मिळूक व्हयी..
आवशीक खाल्ल्यानं
कोल्ह्यान नाय ता..
मिळतली तेव्हा मिळतली
सणाच्या तोंडावर ठरलेलीच
राजकीय कोल्हेकुई..!!
😜*********$p...........😜

|| उरलेत मागे ||

|| उरलेत मागे ||
==========
कैफियत होती तिची
भर पावसात तो
कोरडा वागतो..
नुसताचं इकडे तिकडे
बरसतो..
वळवाच्या पावसा सारखा
आगंतुक येतो..
दोन चार थेंब शिंपडून
नामानिराळा होऊन जातो..!!

किती काळ चालणार
असेच.?
बरस ना रे
कधीतरी बेधुंद..
मोडून टाक सारे
फसवे प्रतिबंध..
कर रिता आसमंत
अन होऊ दे मन
निश्चल शांत..!!
कळले असावे त्यास ,
तो बरसला मुक्त
मोडून कयास
झुगारून सारेच संकेत..
उलघडू लागला
पदर एक एक
क्षणात,
चिंब ती अन चिंब तो
भिजले अवचित
नखाशिकांत..!!
उधणली नदी
दुथडी भरून वाहू लागली
भाव भावनेच्या पुरात
वाट सोडून धावू लागली
गंध ओल्या प्रीतीचा
दरवळला श्वासात
अन
रात्र मंत्रमुग्ध
मूक हुंकार भरू लागली..!!
आता,
निघून गेला पाऊस
ओसरला पूर
अन उरलेत मागे
मात्र गरम उच्श्वास,
चुरगळलेली चादर,
तथा विस्कटलेला
केश संभार..
क्षणिक अनामिक तृप्ती
अन सारे कसे शांत शांत
तो पुन्हा बरसून येईपर्यंत
असणार तिला
त्याच्या याच आठवणींचा
फसवा आधार..!!
*****सुनिल पवार.......💦

Tuesday, 23 August 2016

|| अंधार ||

|| अंधार ||
=======
लहानपणी घाबरत होतो
अंधाराला
म्हणायचो, आई दिवा लाव ना
आई लावायची दिवा
घरात अन दारात
तसेच चित्र दिसे
आजूबाजूच्या परिसरात..!!

मी विचारायचो आईला
आई,
घरात ठीक आहे गं
पण सांग ना,
कशाला पाहिजे दिवा दारात..?
म्हणायची आई हसून
तुला आवडतं ना खेळायला..?
शिवाय कोणी वाटसरू नको
ठेचाळुन पडायला मार्गात..!!
अप्रूप वाटले होते तेव्हा
मला आईचे आणि शेजारधर्माचे
तसेच त्यांच्या हृदयातील
दिव्य प्रकाशाचे..
सूर्य चंद्राचे कोंदण घेऊन
जन्मलेल्या
असंख्य तारकांना सामावून घेणाऱ्या
त्या विशाल आकाशाचे..!!
आता तिमिरातच चाचपडतोय
माणूस
आकाश फाडून,
मनातील सूर्य केव्हाच गेलाय मावळतीला
अन दिवे लावण्यासही
तो सोयीस्कर विसरलायं..
भय आजही कायम आहे
अंधाराचे
तरीही कळेना कशास..?
हा अंधार त्यास आता
अधिक जवळचा वाटू लागलायं..!!
******सुनिल पवार....✍🏽

|| कविता तेव्हा आता ||


|| कविता तेव्हा आता ||
==============
पूर्वी त्या ओळीत
पद्यात असायच्या
आता गद्यात गातात..
काही उथळ
काही खोल
काही अध्यात,
मध्यात राहतात..!!

लोक म्हणतात
त्यांस कविता
म्हणून मी ही
मूक दुजोरा देतो..
ते म्हणताहेत
तर असणारच
समजून त्यांस
मुजरा करतो..!!

ऐकलंय मी
पूर्वी कवितांची
म्हणे गाणी होती..
आताची गाणी ऐकून
कळतेच आहे
आजच्या कवितांची
खरी महती..!!
****$p.....✍🏽

|| अजीब रिश्ता ||

|| अजीब रिश्ता ||
===========
बड़ा अजीब होता है,
आँखों का दिल से रिश्ता
आँखों से होता बया,
यह खामोश दिल बावरा..

चोट लगती दिल पे मगर,
रो देती है अक्सर आँखे..
दिल का यु तड़पना यारो,
न होता आँखों को गवारा..!!
******सुनिल पवार....✍🏽

|| कधी बदलणार ?||

|| कधी बदलणार ?||
=============
लहानपणी वाचली होती
आता धुसरशी आठवतेय
झोपी गेलेल्या राजकन्येची गोष्ट..
अन तिच्या सोबत झोपलेली
समस्त प्रजा तथा राज परिवार
आज पुन्हा दिसली स्पष्ट..!!

वाचलं होतं तिला उठवायला
दूर देशातून माहीत नाही कोठून
एक देखणा राजपुत्र आला..
त्याने म्हणे उठवले होते
समस्त राजपरिवाराला अन
झोपलेल्या त्या समस्त जनतेला..!!
तशीच किमया आज घडली
अनुभवतोय तीच गोष्ट नव्याने
मात्र पात्र आहेत आता बदललेली..
इथे मात्र प्रत्यक्षात अनुभवतोय
गोष्टीतल्या राजकुमाराची जागा
समर्थपणे दोन राजकन्येनीं घेतलेली..!!
त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाने
समस्त झोपलेली जनता तथा शासनकर्ते
आता खडबडून जागे झाले..
निदान भासताहेत तरी तसेच
बेटीचे अनन्य महत्व जगी
बेटींनी पुन्हा अधोरेखित केले..!!
प्रश्न आता हाच आहे
की, ही जागलेली समस्त जनता
नक्की किती काळ जागी राहणार..??
का बैल गेला अन झोपा केला असच होणार..?
अहो काळ बदलला दुनया बदलली
आम्हा भारतीयांची मानसिकता
सांगा ना कधी बदलणार..??
*****सुनिल पवार....✍🏽

|| डोळस आंधळे ||

|| डोळस आंधळे ||
===========
डोळस..?
आंधळेच एकजात
चाचपडत आहेत
जगास सूर्य
दाखवत आहेत..
ना बुडाचा पत्ता
ना खोलीचा अंदाज
तरीही हिरीरीने
गगनाची उंची
नापत आहेत..!!

दोन बाजू असतात
नाण्याला
हे त्यांच्या
गावीच नसते..
आंधळाच त्यांचा
स्पर्श
अन आंधळाच
हर्ष
म्हणतात मग
छातीठोकपणे
असे नाणे
कुठेच नसते..!!
***$p.....✍🏽

Friday, 19 August 2016

|| दहीहंडी ||

|| खबर खोद के ||
===========
ते म्हणाले,
आता स्टुलावर चढून,
मजेत हंडी फोडायची..
20 फुटाची मर्यादा,
बिलकुल नाही तोडायची..!!

राज्यकर्ते कुचकामी,
कोर्ट मात्र सरकार चालवते..
गरजवंताची पाळी येता,
नेमकी डोळ्यावर पट्टी असते..!!
सर्व घटनांचा आढावा घेऊन,
म्हणे सरकार पाऊल उचलणार..?
मानासिकते शिवाय सांगा,
शिव धनुष्य कसे पेलणार..??
*******$p...........😜

|| पाटी ||

|| पाटी ||
======
आठवतयं मला,
बऱ्याच पुस्तकाच्या गर्दीत
अद्वितीय ती पाटी होती..
असंख्य ज्ञान दालनांची
एकमेव ती ताटी होती..!!

लिहले किती, किती पुसले
शब्द कैक तिने वेचले..
दिसले ना जरी कोणास
पांढऱ्या हाताचे होते दाखले..!!
अक्षर अक्षर मोतीसमान
हृदयावर ती कोरत गेली..
ज्ञान गंगेचा पावन कुंभ
ओतपोत ती भरत गेली..!!
आता पाटी गेली,वही आली
विविध विषयांची साठवण झाली..
किती भरली, ना डोक्यात शिरली
अन पाटीची मज आठवण झाली..!!
डिजिटल झाला अभ्यासक्रम
पण पाटीची ना सर त्याला..
हृदयात कोरल्या अक्षरांना
फुटल्या पाटीने आवाज दिला..!!
*******सुनिल पवार......✍🏽

Monday, 15 August 2016

|| चर्चा ||


|| चर्चा ||
======
आताशी ती
बरीच उधाणात आहे..
म्हणे पावसाची
तिला साथ आहे..
कोणी म्हणतोय
वाऱ्याचा हात आहे..
सारेच हिरीरीने
मांडत आहेत मुद्दा
कळेना का उगाच
भांडत आहेत..
जसे सर्व काही
त्यांस ज्ञात आहे..
पण
सगळाच मामला
आत बट्ट्यात आहे..!!
😜😀😜😀😜
****सुनिल पवार....

|| पंच(क) नामा ||


|| पंच(क) नामा ||
============
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
ठेंगा दाखवे अंगठेबाज
जरा समजून घे अंदाज
निराळाच परी त्याचा बाज
तू बारकाईने वाच..
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
दर्शवे काय ती तर्जनी
ऐक जरा तिची वाणी
गुण दोषांची महाराणी
भासे आरस्पाणी काच..
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
दृष्टी तिची उंच भारी
ती मध्यका भली बिचारी..
विनयशील दिसे विचारी
जणू जाणते खळगे खाच..
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
म्हणतात तिज अनामिका
नाव तीला ठेवू नका
चालविते आपलाच हेका
लुडबुडते उगाच..
पाच तऱ्हेची पाच
तू नाच बेटा नाच..!!
करंगळी रणभेरी तुतारी
इवली परी बलवान भारी
भल्या भल्यांची उडे भंबेरी
मारताचं ती टाच..
पाच तऱ्हेची पाच
तू नाच बेटा नाच..!!
****सुनिल पवार....😜

|| झोल ||

|| झोल ||
😜==😜
जितकी तोंडे
तितके बोल..
कसले उथळ
अन काय खोल..
कसबी खरा
तो वाजपी अनमोल..
अन्यथा वाजवा डबे
वा बडवा ढोल..!!

तर्कांचा तराजू
दोलायमान नेहमी..
कसली हामी
अन कसला कमी..
हुकमाचा एक्का
नेहमीच कामी..
नफ्याचा सौदा
अन काट्यात झोल..!!
शिवशिवतात हात
दाखवतात बोट..
कसली उणीव
अन कसली खोट..
उग्र दर्पाची
बांधली मोट..
नाकाची उगाच
ती कांदे सोल..!!
जितकी तोंडे
तितके बोल..
कसले उथळ
अन काय खोल..!!
*****$p*****

|| कवी ते कवी ||

|| कवी ते कवी ||
😜=======😜
कवीला जात नसते म्हणतात
पण भेद मात्र आहे..
प्रस्थापित अन नवोदित
अस न भरणारं पात्र आहे..!!

काय निकष असतील बरे
प्रस्थापित अन नवोदितात..?
प्रश्न तसा वृथाच आहे
सत्य मात्र शब्द दाखवितात..!!
कैक कवींना पाहिले वाचले
भेद न मला तसे दिसले..
शब्द कमी कोंडाळे जास्त
नामवंत मध्ये होते बसले..!!
अनुभवाचा जरी वानवा
शब्द पेटवितात तरी वणवा..
उलघडे हळुवार कप्पे मनाचे जो
तोच खरा जनमनात जाणावा..!!
तुम्ही माना अथवा
मानू नका
किंतु मनात आणू नका..
दिसले तसेच मांडले
कवींनो
उगाच भुवई ताणू नका..!!
😜😀😜😀😜😀
****सुनिल पवार....

|| दिल में है ||

|| दिल में है ||
=========
हाथ जोड़ आते नेता
कहते,वोट दो मुझको यहाँ..
बैठ जातेही कुर्सीपर
पहचानते कहो किसको यहाँ..!!

मुफ्त में मिली आझादी का
मोल है किसको यहाँ..
भ्रष्टाचार,अत्याचार,कालाबाजार
चलता इनका डिस्को यहाँ..!!
कड़वे लगे बोल आपको
दोष न दो मुझको यहाँ..
दिल है भारत मेरा
दिखाऊँ मगर, किसको यहाँ..!!
*********$p********🇮🇳

|| चौकातल्या सिग्नलवर ||


|| चौकातल्या सिग्नलवर ||
==●==●==●==●==●==
चौकातल्या सिग्नलवर
ऊन, पाऊस झेलत
ती चिमुरडी
तिरंगी झेंडे
जीव तोडून
विकत होती..
अकाली छाटलेले
तिचे पंख मलूल
अन
पोटात भुकेची
आग होती..!!

मी ऐटीत घेतला
एक झेंडा
आपल्या वातानुकूलित
गाडीवर चिकटवला
पाच रुपये भिरकावले
न काहीच वाटले
मनाला
देश प्रेमाची
झापड डोळ्यावर होती
मला कुठे हो तशीही
जाग होती..!!
कळत नव्हते
महत्व स्वातंत्र्य दिनाचे
त्या कोवळ्या जीवाला
तरीही वाटत असेल तिला
की, रोज यावा
असाचं स्वातंत्र्य दिन
आपल्या घराची
चूल पेटवायला..
पण मला तरी
कुठे हो कळलायं..?
मलाही वाटतंय
नेमकं तसेच की,
रोज यावा
असाचं स्वातंत्र्य दिन
मन मुराद, बेलगाम
सुट्टी उपभोगायला..!!
**जय हिंद**
***सुनिल पवार....

II आमच्या स्वातंत्र्याची लढाई II

II आमच्या स्वातंत्र्याची लढाई II
===================
सत्तरीच्याही वरची झाली
आमची उत्तुंग लोकशाही..
पण आमच्या स्वातंत्र्याची लढाई 
अजूनही संपलेली नाही..!!
दिवस असो वा रात्र असो
परिस्थितीत कुठे बदल नाही..
ह्या देशातली स्त्री अबला
देशातच सुरक्षित नाही..
भिंतीच्या चौकटीत घुसमटतेय
आमची भगिनी अन् आई..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
जगण्याचा समान हक्क
सर्वांस दिला घटनेने जरी..
दिवसागणिक वाढत चाललीय
जनमनात जातीयतेची दरी..
किती झाले अत्याचार जातीय
त्यास कसली गणती नाही..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
राजरोस लुटून नेतो सावकार
शेतशिवार आणि घरदार..
हतबल आमचा बळीराजा
घेतो फासाचा केवळ आधार..
शासनकर्त्यांनाही त्याचं काही
सोयर सुतक दिसत नाही..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
निवडून देतो आम्ही नेता
थकत नाही तो नेता नेता..
पिढ्यान पिढ्याचं वरपून घेतो
अन् चिपाड होतो करदाता..
आपलाच देश,आपलीच जनता
बोलायची कुठे सोय नाही..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
--सुनिल पवार...✍️

|| माझा भारत देश महान ||

|| स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
======================
धमण्यांतून नित्य वाहे
माझ्या देशाचा अभिमान..
नजरेत भरून राहे
माझ्या तिरंग्याची शान..!!

जन्म भूमी तू,
कर्म भूमी तू,
तूच माझी आण, प्राण..
हृदयात चिरंतर आहे
माझा भारत देश महान..!!
****जय हिंद****
***************$p........

Tuesday, 9 August 2016

|| खबर खोद के || (गोरक्षण)

|| खबर खोद के ||
============
ते म्हणले,
गोरक्षणाच्या नावाखाली
त्यांनी चालिवला व्यापार..
म्हणले ते अन कळलं बघा
लई वंगाळ असतोय
ह्यो खुर्चीचा आजार..!!
😜********************😜
आता तर काय..?
म्हणे,
तिसरे महायुद्ध जगात
गाईमुळे होणार..
ह्या बोलक्या ह्या पोपटांचे सांगा
तोंड कसे धरणार..??
😜********************😜
ऐकावं ते भौ नवल आहे
कळे ना,
कोणाचं पाठबळ आहे..
इतकं मात्र खरं
ही दिखाव्याची कळवळ आहे
तसा समदाच पोरखेळ आहे
अन..
जातीयवादाची वळवळ आहे..!!
😜********************😜
जगाचं काय सांगता यायचं न्हाई
पण..
देशात युद्ध घडेल इतकं मात्र नक्की..
राजकारणी घालतील पहिली काडी
ही खबर आहे तितकीच पक्की..!!
😬*********$p**********😬

|| खबर खोद के || (आम-दार पगारवाढ)

|| खबर खोद के ||
============
आम बिचारा दारोदार
लाखात खेळतोय आमदार..
पाहिलंय का कोणी कधी
असा सर्वसुखी नोकरदार..?

ना संप, ना बंदची हाक
नाही उपोषणाचे हत्यार..
तुम्ही मागा आम्ही देतो
तत्पर किती, पहा सरकार..!!
आठवून पहा, तो मिल कामगार
झाला कफल्लक, ना वाढला पगार..
हक्काच्या याच मागणीपायी
सुटले काम,सुटले घरदार..!!
*****सुनिल पवार....

|| कुंभकर्ण ||

|| कुंभकर्ण ||
========
अहो कुंभकर्ण आहे तो
असा सहजा सहजी
उठणार नाही..
त्याच्या उत्तुंग घोरण्यापुढे
तुम्हास कंठ फुटणार नाही..!!

वाजवा कितीही रणभेरी,
करा किती आक्रोश
द्या शाब्दिक फटकारे,
वा काढा कितीही चिमटे..
गेंड्याच्या कातडीचा तो
नाही बधणार तुम्हास
त्याच्यापुढे कुचकामी
तुमचे भाले अन काटे..!!
नाही,
तुम्ही करा खुशाल प्रयत्न
तुम्हास कोणी अडवणार नाही..
पण मुदतीचा हा रोग त्याचा
तो मुदतीशिवाय उठणार नाही..!!
उठलाच जरी चुकून कधी
तो तुमच्या कोलाहालाने,
अन सज्ज झाला लढायला
तुमच्या बाजूने..!!
तर तुम्ही जिंकलात
असं समजणे काही
शहाणपणाचं लक्षण नाही..
कारण,
हे धूड इतकं मोठं आहे
की ते पडल्यावरही
सर्व सामान्यांना
चिरडल्याशिवाय राहणार नाही..!!
*****सुनिल पवार....

🌺हॅलो मुंबई🌺

🌺हॅलो मुंबई🌺
=========
मुंबापुरीचं सौंदर्य
त्याच्या नजरेत भरलं
आज त्याचं हृदय
मुंबापुरीवर आलं..
वेडं हे मन
वाऱ्यानं नादावलं
थेंब थेंब झेलत
चिंब चिंब न्हालं..!!
**सुनिल पवार...

||प्रेमसमा||

||प्रेमसमा||

धुंद बरसती जलधारा
फुलवीत मन मोरपिसारा।
चिंब भिजवतो तनमनास
तो थेंब टपोरा निलाजरा।
झोंबे अंगाशी अवखळ वारा
अस्ताव्यस्त करी पदरपसारा।
खेळे कुंतली बेभान होऊन
थरथर कांती कंप अधरा।
उडता ऐसी त्रेधातिरपीट
एक कवडसा येई आधारा।
अलवार बांधून प्रेमसमा
देई किरणांचा उबदार सहारा।
--सुनील पवार..✍️
164
People Reached
5
Engagements
4

Monday, 1 August 2016

|| ज्वलंत ||

|| ज्वलंत ||
=======
आम्ही नेहमीच
चीड चीड करतो..
त्यांच्या नावाने
खडे फोडतो..
ही गोरी माकडं
आमच्या देशात येतात..
आमच्या बकालीकरणाचे
चित्रण करतात..
आमची अब्रू
वेशीवर मांडतात..!!

बोंबलतो आम्ही
त्यांना असावा
डोळ्यांचा विकार..
का दिसत नाही
आमचा अविष्कार..
आमच्या देशातील
विविधता..
ती नटलेली सुंदरता..!!
शेवटी परकेच ते
त्यांना कसले
सोयर सुतक असणार..?
पण आम्ही तर
ह्या मातीत जन्मलो
सांगा आम्ही
कधी सुधारणार..?
आमचा चित्रकारही
त्यांचाच कित्ता गिरवतोय..
जीर्ण झाल्या कापड्यातून
दिसणाऱ्या अवयवाचे
तो ही प्रदर्शन भरवतोय..
आमचा साहित्यिकही
काही कमी नाही..
शब्दांच्या झरोक्यातून
तो ही हळूच डोकावतोय..!!
कधी डोंबारीन,
कधी भिकारीन
कधी कोल्हाटीन
कधी लाल बत्तीच्या
वस्तीवरही जातोय..
जिथे जातोय तिथे
पिचलेली बाईच पाहतोय..
स्त्री मुक्ती,
सामाजिक विषमता,
अबलांवर अत्याचार
अशा ज्वलंत विषयावर
म्हणे
तो भाष्य करतोय..
का आपल्याच पुस्तकांचा
तो खप वाढतोय..??
***सुनिल पवार...

|| गटारी ||

|| गटारी ||
=======
आली आली
माणसाची गटारी..
आली बिचाऱ्या
कोंबड्याची बारी..
आता हळूच फिरेल
मानेवर सूरी..
माणसाच्या जिभेचे
चोचले भारी..!!
***सुनिल पवार...😜