|| देवकी नंदना ||
===========
देवकी नंदना,यशोदेच्या कान्हा
तू जन्मलास बंदिशाळेत
अन
लीलया तेथून निसटलास काय
लोक
बंदिशाळेच्या प्रेमात पडले
कंस,शिशुपाल,दुर्योधन, दुःशासन
ह्या ना त्या कारणाने
कारागृहास भेट देत आहेत
हातात हात गुंफुन,गळ्यात गळे घालून
राजरोस मुक्काम करत आहेत
बंदिशाळा ओसंडून वाहत आहे
फरक इतकाच
हे कोडगे निर्लज्ज लोक,
त्यास
आता जेलवारी म्हणतात..!!
तू एक पुतना मावशी काय मारलीस
पण गल्लीबोळात तिची पिल्लावळ
वळवळ करू लागली आहे..
जणू मागील जन्माचा सूड उगवतेय
नपुंसक साले
नासवू पाहताहेत देशाचं भविष्य
भेसळयुक्त दूध पाजून
वरून
हेच मायेचे नालायक पूत
त्यास
आता धंदा संबोधतात..!!
तू गोपिकांना आनंद दिला
राधेस प्रेम दिले
रुक्मिणेस विशेषाधिकार
सत्यभामेचा हट्ट पुरवला
द्रौपदीस बहीण मानले
राखी बांधून घेतली तिला वस्त्र पुरवले
मिरेस मोक्ष दिला
बंदिस्त स्त्रीयांसही सन्मान दिला
वर्णाव्या तरी किती
अशा अनंत तुझ्या लीला..
पण
आमच्या गोपाळांनी मात्र
अर्थाचा अनर्थ केला
छेडू लागले आया,बहिणीस
आड वाटेवर दबा धरून बसले
प्रसंगी,
जारासंघ, दुर्योधन,दुःशासन झाले
कधी प्रेमात भुलवून,कधी घात लावून
सर्वस्व लुटले,अत्याचार चालविले
अन
वर तोंड करून हेच लांडगे
त्यास मर्दुमुखी म्हणू लागले..!!
दरवर्षी तुझा जन्मोत्सव येतो
भक्तिभावे मी नतमस्तक होतो
तुझ्या लीलांचे गुणगानही गातो
पण कान्हा,
कळेना मज, तू नेमका कुठे असतो..?
ना घरात ना दारात,
ना दहीहंडीच्या कोणत्या थरात
ना विचारात, ना आचारात
नाही कोणत्या जन्मोत्सवात..
नेमका ह्याच संधीचा फायदा,
मी सुद्धा घेतो
अन
तुझ्या वाट्याचे प्रसादरूपी दही मीच फस्त करतो
कळत नाही कोणास, दिसतही नाही कोणास
माझ्यातील भक्त न जाणे कुठे लुप्त असतो
मात्र एक आहे
असा गोपाळकाला आता ठायी ठायी दिसतो..!!
|| जय श्री कृष्ण ||
****सुनिल पवार....
===========
देवकी नंदना,यशोदेच्या कान्हा
तू जन्मलास बंदिशाळेत
अन
लीलया तेथून निसटलास काय
लोक
बंदिशाळेच्या प्रेमात पडले
कंस,शिशुपाल,दुर्योधन, दुःशासन
ह्या ना त्या कारणाने
कारागृहास भेट देत आहेत
हातात हात गुंफुन,गळ्यात गळे घालून
राजरोस मुक्काम करत आहेत
बंदिशाळा ओसंडून वाहत आहे
फरक इतकाच
हे कोडगे निर्लज्ज लोक,
त्यास
आता जेलवारी म्हणतात..!!
तू एक पुतना मावशी काय मारलीस
पण गल्लीबोळात तिची पिल्लावळ
वळवळ करू लागली आहे..
जणू मागील जन्माचा सूड उगवतेय
नपुंसक साले
नासवू पाहताहेत देशाचं भविष्य
भेसळयुक्त दूध पाजून
वरून
हेच मायेचे नालायक पूत
त्यास
आता धंदा संबोधतात..!!
तू गोपिकांना आनंद दिला
राधेस प्रेम दिले
रुक्मिणेस विशेषाधिकार
सत्यभामेचा हट्ट पुरवला
द्रौपदीस बहीण मानले
राखी बांधून घेतली तिला वस्त्र पुरवले
मिरेस मोक्ष दिला
बंदिस्त स्त्रीयांसही सन्मान दिला
वर्णाव्या तरी किती
अशा अनंत तुझ्या लीला..
पण
आमच्या गोपाळांनी मात्र
अर्थाचा अनर्थ केला
छेडू लागले आया,बहिणीस
आड वाटेवर दबा धरून बसले
प्रसंगी,
जारासंघ, दुर्योधन,दुःशासन झाले
कधी प्रेमात भुलवून,कधी घात लावून
सर्वस्व लुटले,अत्याचार चालविले
अन
वर तोंड करून हेच लांडगे
त्यास मर्दुमुखी म्हणू लागले..!!
दरवर्षी तुझा जन्मोत्सव येतो
भक्तिभावे मी नतमस्तक होतो
तुझ्या लीलांचे गुणगानही गातो
पण कान्हा,
कळेना मज, तू नेमका कुठे असतो..?
ना घरात ना दारात,
ना दहीहंडीच्या कोणत्या थरात
ना विचारात, ना आचारात
नाही कोणत्या जन्मोत्सवात..
नेमका ह्याच संधीचा फायदा,
मी सुद्धा घेतो
अन
तुझ्या वाट्याचे प्रसादरूपी दही मीच फस्त करतो
कळत नाही कोणास, दिसतही नाही कोणास
माझ्यातील भक्त न जाणे कुठे लुप्त असतो
मात्र एक आहे
असा गोपाळकाला आता ठायी ठायी दिसतो..!!
|| जय श्री कृष्ण ||
****सुनिल पवार....

No comments:
Post a Comment