II ते प्रेम असते II
===========
आतुर ती..
विरहाच्या आगीत
जेव्हा होरपळते..
दूर असणाऱ्या त्यास
नेमके तेव्हा कळते..
ते प्रेम असते..!!
===========
आतुर ती..
विरहाच्या आगीत
जेव्हा होरपळते..
दूर असणाऱ्या त्यास
नेमके तेव्हा कळते..
ते प्रेम असते..!!
गहिवरते मन त्याचे
नकळत पाझरते..
अन तृप्त होते ती
नवं टवटवी लेविते..
ते प्रेम असते..!!
दगडासही पाझर फुटतो
त्याचेही मन द्रवते..
झुळझुळ वाहते पाणी
अन अलवार हिरवळ्ते..
ते प्रेम असते..!!
साथ तिची देता
ती अल्लड आरक्त होते..
वळणा वळणाने आवेगे
त्याचीच होऊन जाते..
ते प्रेम असते..!!
नभाचं ते धरेशी
पाथराचे झऱ्याशी
सरितेचे सागराशी
नाते असेच असते..
नकळत मनी बसते
अन लेखणी अंकुरते
ते प्रेम असते..!!
***सुनिल पवार....
नकळत पाझरते..
अन तृप्त होते ती
नवं टवटवी लेविते..
ते प्रेम असते..!!
दगडासही पाझर फुटतो
त्याचेही मन द्रवते..
झुळझुळ वाहते पाणी
अन अलवार हिरवळ्ते..
ते प्रेम असते..!!
साथ तिची देता
ती अल्लड आरक्त होते..
वळणा वळणाने आवेगे
त्याचीच होऊन जाते..
ते प्रेम असते..!!
नभाचं ते धरेशी
पाथराचे झऱ्याशी
सरितेचे सागराशी
नाते असेच असते..
नकळत मनी बसते
अन लेखणी अंकुरते
ते प्रेम असते..!!
***सुनिल पवार....

No comments:
Post a Comment