Sunday, 10 December 2017

|| हे फिनिक्स पक्ष्या ||

|| हे फिनिक्स पक्ष्या ||
=============
तो मनात काळं भरून आला
म्हणाला,
आता पाऊस म्हण मला
मी म्हटले,
नवा डिर तरी रुजव..!!
तो लालबुंद झाला
म्हणाला,
सूर्य म्हण मला
मी म्हटले,
आधी काळोख तर मिटव..!!
तो घोंगावत आला
म्हणाला,
वादळ म्हण मला
मी म्हटले,
जरा झुळूक तर अनुभव..!!
तो मातीशी एकरूप झाला
म्हणाला,
आता राख म्हण मला
मी म्हणालो,
हे फिनिक्स पक्ष्या...
आता झेपाव..!!
--सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment