Sunday, 10 December 2017

|| जळमटे ||

तिच्यातील ती
::::::::::::::::::::::::::::
|| जळमटे ||
========
आज
ती जरा घुश्यात म्हणाली
अहो
आज शेवटचा रविवार
दोन दिवसावर दिवाळी आली
निदान आज तरी
घर सफाईला हातभार लावा
ती केरसुणी घ्या
आणि जळमटे झाडा
जरा तुमच्याही कामाचा
उजळू दे दिवा..!!

मी
नाईलाजाने केरसुणी घेतली
आणि सारी जळमटे झटकली
कोपरा-न-कोपरा लख्ख केला
अन म्हणालो
बघ उजळल्या ना भिंती..?
आणि
अडगळ पण कमी झाली
आताच बघून घे
अजून काही राहिले तर नाही..?
ती हसली म्हणाली
हो राहिलंय ना..
मी म्हणालो
आता आणखी काय..?
ती म्हणाली
मनाची जळमटे.
तेव्हढी साफ करा
मी म्हटलं कुणाच्या.?
तर ती पुन्हा हसली
म्हणाली
अहो असं काय करता.?
मी माझी साफ करते
तुम्ही तुमची करा..!!
***सुनिल पवार..✍🏼😊
**दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा**

No comments:

Post a Comment