आत्मपरीक्षण..
पळसाला
ठाऊक नसेल कदाचित
त्याच्या पेटण्यामागचे
खरे कारण..
पण
त्याच्या सावलीतच विसावलंय
अग्नी दाहाचे
शीतल निवारण..!!
का
गुलमोहराने केला असावा
तप्त सुर्यमुकुट धारण..
त्याच्या
अंथरलेल्या हृदयातुन
जाणवतेय
निस्सीम प्रेमाची पखरण..!!
गुलमोहराने केला असावा
तप्त सुर्यमुकुट धारण..
त्याच्या
अंथरलेल्या हृदयातुन
जाणवतेय
निस्सीम प्रेमाची पखरण..!!
बाऊ काट्यांचा
हवा कशाला.?
घे जाणून
कुंपणांच निर्मोही रक्षण..
सांगणार नाही विसंबून रहा
पण
करायला हवं मात्र
अंतरातून निरीक्षण..!!
***सुनिल पवार...

No comments:
Post a Comment