II मन मनाचे II
मन मनाचे खेळ सारे..
भासतात का मनास न्यारे..
मन मनाच्या ह्या खेळात..
हार जीत कुठे असते का रे...!!
बुद्धी असो वा बळ असो..
मनास त्याचे काय वावडे..
मन मनाचे असते चंचल बावरे..
थोड़े शहाणे जरासे वेडे..!!
नसे मनाचा थांग कोणा..
मन मनाचे ते गुपित प्यारे..
आठवता मग पुन्हा सारे..
मन मनाचे का हेलकावते रे..??
मन मनाचे का हेलकावते रे..??
*चकोर*

No comments:
Post a Comment