।। मन पाऊस पाऊस ।।
एक छत्री आपण दोघ..
असेच कधी बसलो होतो..
विसरलीस तू सारेच..
मी अजुन तिथेच होतो..!!
दूर झालीस तू आता..
किती आळवू मी पावसाला..
फुटला न कधी पाझर तुला..
न फुटला त्या आभाळाला..!!
वैरान झाले धुंद तराणे..
उरले मागे पाऊस गाणे..
आला पाऊस गेला पाऊस..
प्राक्तन ठरले अश्रुत भिजणे..!!
नित्य आभाळ दाटून येते..
आठवणीत मन धावते..
सरी वर सर बरसते..
मन पाऊस पाऊस होवून जाते..!!
*चकोर*
एक छत्री आपण दोघ..
असेच कधी बसलो होतो..
विसरलीस तू सारेच..
मी अजुन तिथेच होतो..!!
दूर झालीस तू आता..
किती आळवू मी पावसाला..
फुटला न कधी पाझर तुला..
न फुटला त्या आभाळाला..!!
वैरान झाले धुंद तराणे..
उरले मागे पाऊस गाणे..
आला पाऊस गेला पाऊस..
प्राक्तन ठरले अश्रुत भिजणे..!!
नित्य आभाळ दाटून येते..
आठवणीत मन धावते..
सरी वर सर बरसते..
मन पाऊस पाऊस होवून जाते..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment