Wednesday, 9 July 2014

।। तुझ्या भेटीसाठी देवा ।।




।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
*************************************
।। तुझ्या भेटीसाठी देवा ।।

तुझ्या भेटीसाठी देवा..
जीव वेडावला..
भक्ता भेटीसाठी जिथे..
देव विसावला..!!

वाट तुझी धरली देवा..
आलो पंढरपुरी..
एकादशी दिवशी द्वारी..
जमले वारकरी..!!

पाहण्या सोहळा अवघा..
स्वर्गही लोटला..
देवांसही दुर्लभ ऐसा..
विठू मज भेटला..!!

सुखावलो आता देवा..
पारणे फिटले..
दर्शन मात्रे तुझिया देवा..
पातक मिटले..!!

आशीर्वाद लाभों आम्हा..
नित्य तुझा देवा..
संतांचा सहवास घडो..
कृपा दृष्टि ठेवा..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment