II मिश्किल प्राजक्त II
प्राजक्त मिश्किल बहरला..
आसमंती गंध दरवळला..
सहवासास मग त्याच्या..
जो तो इथे भुलला..!!
करिता सागर मंथन..
देवेन्द्रास तो लाभला..
भावाला सत्यभामेला..
श्रीकृष्णे भूवरी आणिला..!!
परसदारी तयास प्रेमे..
सत्यभामे जोपासिला..
आस तिज फुलांची..
कौतुके न्याहळी त्याला..!!
पण काय म्हणावे..
त्या प्रभूच्या मायेला..
नकळे ती कोणाला..
अघाध असे त्याची लीला..!!
हट्ट पुरवला सत्यभामेचा..
परी फुले न मिळती तिला..
वंचित राही सत्यभामा..
फुले मिळती रुक्मिणीला..!!
*चकोर*
प्राजक्त मिश्किल बहरला..
आसमंती गंध दरवळला..
सहवासास मग त्याच्या..
जो तो इथे भुलला..!!
करिता सागर मंथन..
देवेन्द्रास तो लाभला..
भावाला सत्यभामेला..
श्रीकृष्णे भूवरी आणिला..!!
परसदारी तयास प्रेमे..
सत्यभामे जोपासिला..
आस तिज फुलांची..
कौतुके न्याहळी त्याला..!!
पण काय म्हणावे..
त्या प्रभूच्या मायेला..
नकळे ती कोणाला..
अघाध असे त्याची लीला..!!
हट्ट पुरवला सत्यभामेचा..
परी फुले न मिळती तिला..
वंचित राही सत्यभामा..
फुले मिळती रुक्मिणीला..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment