II प्रतीक्षा न संपणारी II
न संपणारी प्रतीक्षा,
मी आजही करतो आहे..
भोवताली तुझ्या,
जीव अजूनही घुटमळतो आहे..!!
नव्हत्या काही चुका,
भरपाई मी करतो आहे..
आसवांच्या वर्षावात,
देह अजूनही जळतो आहे..!!
तीळ तीळ मरून नित्य,
मी जगणे सुकर करतो आहे..
दिल्या घेतल्या वचनांचा,
तो शब्द अजूनही छळतो आहे..!!
तुटल्या सा-या माळा,
मी आठवणीत गुंफतो आहे..
सुकल्या प्रेम फुलांचा,
गंध अजूनही दरवळतो आहे..!!
*चकोर*
न संपणारी प्रतीक्षा,
मी आजही करतो आहे..
भोवताली तुझ्या,
जीव अजूनही घुटमळतो आहे..!!
नव्हत्या काही चुका,
भरपाई मी करतो आहे..
आसवांच्या वर्षावात,
देह अजूनही जळतो आहे..!!
तीळ तीळ मरून नित्य,
मी जगणे सुकर करतो आहे..
दिल्या घेतल्या वचनांचा,
तो शब्द अजूनही छळतो आहे..!!
तुटल्या सा-या माळा,
मी आठवणीत गुंफतो आहे..
सुकल्या प्रेम फुलांचा,
गंध अजूनही दरवळतो आहे..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment