Tuesday, 22 July 2014

हे..ना..ते



हे..ना..ते

हे..ना..ते..कळेना कसले..
कधी हसले..कधी फसले..!!

हे..ना..ते..असे कसले..
कधी खुलले..कधी रुसले..!!

हे...ना...ते..बिज कसले..
कधी रुजले..कधी कोमेजले..!!

हे...ना...ते..स्वप्न कसले..
कधी सजले..कधी थिजले..!!

हे...ना...ते..सुर कसले..
कधी जुळले..कधी भरकटले..!!

हे...ना...ते..मोती कसले..
कधी माळले..कधी बिखरले..!!

हे...ना...ते..जरी संपले..
अश्रूत भिजले..पवित्र झाले..!!

हे...ना...ते..तरी जपले..
मनाच्या सागरात..मोत्याचे शिंपले..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment