।। म्हणुनच रे वेड्या ।।
ठाउक आहे तुला..
तू मला आवडतोस..
म्हणुनच का रे..
तू असा मज छळतोस..!!
कधी धुंद बरसतोस..
कधी लुप्त होतोस..
असा कसा रे..
खेळ नित्य खेळतोस..!!
उशिरा जरी आलास..
चिंब मज भिजवतोस..
अधुऱ्या श्वासांना मग..
गंध नवा देतोस..!!
हौस तुलाही आहे पण..
अलिप्त तू भासवतोस..
भिजवल्या शिवाय सांग ना..
शांत कुठे बसतोस..!!
विरहाच्या क्षणांतुन तू..
प्रेम नवे फ़ुलवतोस..
म्हणुनच रे वेड्या..
तू मला आवडतोस..!!
*चकोर*
ठाउक आहे तुला..
तू मला आवडतोस..
म्हणुनच का रे..
तू असा मज छळतोस..!!
कधी धुंद बरसतोस..
कधी लुप्त होतोस..
असा कसा रे..
खेळ नित्य खेळतोस..!!
उशिरा जरी आलास..
चिंब मज भिजवतोस..
अधुऱ्या श्वासांना मग..
गंध नवा देतोस..!!
हौस तुलाही आहे पण..
अलिप्त तू भासवतोस..
भिजवल्या शिवाय सांग ना..
शांत कुठे बसतोस..!!
विरहाच्या क्षणांतुन तू..
प्रेम नवे फ़ुलवतोस..
म्हणुनच रे वेड्या..
तू मला आवडतोस..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment