Monday, 7 July 2014

II विटाळ II



II विटाळ II
पुण्यवान तू देहाचा..
सुयेरात काय जन्माला..
वंचित झाला देवाला..
का विटाळ असा ठरला..!!

आक्रंदन बहु केला..
ना कोणास समाजाला..
बारा दिवसाचा जणू..
का वनवास तुज घडला..!!

मेला परी ना तू सुटला..
सुतकात पुरता फसला..
फे-यात तेराच्या असा..
का पुरता तू घुसमटला..!!

जाळून स्वतःस परतला..
स्नानाने शुद्ध जाहला..
स्पर्शण्यास ना धजला..
का स्वतःस परका झाला..!!

वृथा घमेंड मग कशाला..
का जपावे मी पणाला..
सर्व पातकाच्या धन्यास..
का पुण्यवान तू समजला..!!

जन्म मरणात असा फसला..
फेरा काही केल्या न चुकला..
पुण्यवान तव देहाचा..
का जन्माचा विटाळ झाला..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment