Tuesday, 22 July 2014

II रूप गर्विता II



II रूप गर्विता II
तू रूप गर्विता तुझी अदा निराळी..
खेळे राधिका जैसे यमुना जळी..!!

मुग्ध लावण्य घेतोय ग माझा बळी..
चोरून पाहतो तुज मी सांज सकाळी..!!

वेडावते मन फिरते तुज भोवताली..
हृदय पाखरू हेलकावतेय वर खाली..!!

नजर वाटेवरी तटस्थ जसे वृक्षवल्ली..
कानोसा घेतो मी प्रत्येक पावलो पावली..!!

घुटमळतो दारी बनून नजरेतला सवाली..
ऐक गा-हाणे मज प्रेम बाधा झाली..!!

माळीन चंद्र तारे कुमकुम वजा भाळी..
होशील का सांग तू माझी घरवाली..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment