Tuesday, 22 July 2014

II नसतेस तू घरात जेव्हा II



II नसतेस तू घरात जेव्हा II

तू नसतेस घरात जेव्हा..जीव होतो कावरा बावरा..
अन घरात पडून राहतो..कामाचा नुसताच पसारा..!!

सुरवात कुठून करावी..काहीच मज समजत नाही..
अन चहा शिवाय बनाविता..मजला काहीच येत नाही..!!

उठण्यापासून बोंब असते..गजराची ही सवय नाही..
तिच्या एका हाके शिवाय..झोप काही उडत नाही..!!

चहा पाजायाला ती नसते..बनवायला जीवावर येते..
अन बनवली जरी जिवावर..चव तिच्या सारखी नसते..!!

बाबा शाळेला उशीर होतोय..मुलांचा धोशा सुरु होतो..
तयारी त्यांची करता करता..माझा tom & jerry होतो..!!

कामावर हमखास लेट होतो..boss हातात मेमो देतो..
घरात तिच्या नसण्याने..ऑफिस मध्येही गोंधळ उडतो..!!

थकून भागून घरी येतो..पुन्हा चक्र चालू होते..
जेवणा मागे मग खिशाला..रग्गड अशी चाट बसते..!!

नसतेस तू घरात जेव्हा..किंमत तुझी कळते तेव्हा..
तू सौख्याचा अमुल्य ठेवा..वाटतो मज तुझा हेवा..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment