वाट तुझी पाहतो...
काय तुझ्या मनात
पाठ फिरवली क्षणात..
व्याकुळ झाला जीव
मळभ दाटले मनात..!!
पाठ फिरवली क्षणात..
व्याकुळ झाला जीव
मळभ दाटले मनात..!!
आटून गेल्या नद्या
परागंदा झाले झरे..
येणार तरी कधी
दिवस त्यांना बरे..!!
परागंदा झाले झरे..
येणार तरी कधी
दिवस त्यांना बरे..!!
मरण पंथास लागले
तहानलेले जीव सारे..
राख झाले रान हिरवे
जीवदान तयांस दे ना रे..!!
तहानलेले जीव सारे..
राख झाले रान हिरवे
जीवदान तयांस दे ना रे..!!
वाट तुझी पाहतो आम्ही
भरून पाऊस डोळ्यात..
अंत नको पाहू असा
ये सत्वरी दाटून मेघांत..!!
--सुनिल पवार...✍️
भरून पाऊस डोळ्यात..
अंत नको पाहू असा
ये सत्वरी दाटून मेघांत..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:
Post a Comment