II टाकळा II
II टाकळा II
आला आला पावसाळा..
रुजून आला टाकळा..
न जाणे कोणी पेरीला..
वाटेवर मस्त बहरला..!!
हिरवे हिरवे गालिचे..
जणू निसर्गाने पसरले..
गोल सुबक पानावर..
पित सुमन बहरले..!!
दान विपुल निसर्गाचे..
सुज्ञ माणसाने हेरले..
जीवनसत्वाचे भांडार..
मग आहारातून घेतले..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment