।। श्रावण ।।
रिमझिम बरसती श्रावण धारा...
वाहे धुंद अवखळ वारा...
शीत लहर स्पर्शे अंगाला..
अवचित उठे गोड शहारा..!!
बेभान होई नदीचा किनारा..
धाव घेई भेटण्या सागरा..
उधान त्यांचे सांगुन जाई..
धुंद मिलनाचा गोड उबारा..!!
सुंदर दिसे श्रृष्टिचा नजारा..
पाना फुलांचा बहर प्यारा..
उंच हिरव्या पर्वत रांगा..
शुभ्र धवल वाहे झरा..!!
सजली नटली तृप्त धरा..
हिरवा शालू दिसे गोजिरा..
ऐसा श्रावण भावे मनाला..
फुले अलवार मन पिसारा..!!
*चकोर*
रिमझिम बरसती श्रावण धारा...
वाहे धुंद अवखळ वारा...
शीत लहर स्पर्शे अंगाला..
अवचित उठे गोड शहारा..!!
बेभान होई नदीचा किनारा..
धाव घेई भेटण्या सागरा..
उधान त्यांचे सांगुन जाई..
धुंद मिलनाचा गोड उबारा..!!
सुंदर दिसे श्रृष्टिचा नजारा..
पाना फुलांचा बहर प्यारा..
उंच हिरव्या पर्वत रांगा..
शुभ्र धवल वाहे झरा..!!
सजली नटली तृप्त धरा..
हिरवा शालू दिसे गोजिरा..
ऐसा श्रावण भावे मनाला..
फुले अलवार मन पिसारा..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment