|| छबी ||
======
काय पुसतेस सखे
काय असे चेहऱ्यात..?
तव छबी पाहताच
मी समाधिस्त विश्वात..!!
======
काय पुसतेस सखे
काय असे चेहऱ्यात..?
तव छबी पाहताच
मी समाधिस्त विश्वात..!!
दिसे चंद्रमा निष्प्रभ
त्या निल आसमंतात..
झाकून घेई वदन
लज्जित मेघ पदरात..!!
नक्षत्रांची उधळण
तुझ्या मुक्त हास्यात..
अवतरे अवनीवर
ही स्वप्नील चांदरात..!!
घे समजून भाव सखे
तव छबी ती हृदयात
तूच तृषा तूच ध्यास
कर पूर्ती ग साक्षात..!!
***सुनिल पवार...
✍🏼
त्या निल आसमंतात..
झाकून घेई वदन
लज्जित मेघ पदरात..!!
नक्षत्रांची उधळण
तुझ्या मुक्त हास्यात..
अवतरे अवनीवर
ही स्वप्नील चांदरात..!!
घे समजून भाव सखे
तव छबी ती हृदयात
तूच तृषा तूच ध्यास
कर पूर्ती ग साक्षात..!!
***सुनिल पवार...

No comments:
Post a Comment