Monday, 7 August 2017

|| विहीर ||

|| विहीर ||
=======
मी
सहज डोकावले
त्या विहिरीत
वाटले
असेल तुडुंब भरलेली..
पण
भर पावसात ही होती
ती
खोल खोल
अगदी खोल गेलेली..!!

मी
उतरलो तिच्या अंतरात
होता
तिमिर भरून त्यात..
खाच खळग्याची ती वाट
अन
काटेकुटे भरून मार्गात..!!
मी
केले बहू प्रयास..
शोधण्या
अंतरातील उगमास..
एक
टिपूस ओझरता
आला दृष्टिक्षेपास..
जणू
सफल झाले सायास..!!
मी
झेलून घेता टिपूस
मज लागला
सारा अदमास..
जाळले तिज नात्याने
तोडला विश्वास..
म्हणूनच तर
तिने अव्हेरले पावसास..!!
***सुनिल पवार....✍🏼

No comments:

Post a Comment