Tuesday, 15 August 2017

|| चंद्र ||

|| चंद्र ||
=====
वाटते मज
चंद्र
नित्य दिसावा..
लपण्यास त्यास
मेघपदर नसावा..
पुनवेचा साज
त्यावर सजावा..
अवसेने घ्यावा
दूरवर विसावा..!!


पण
कलेकलेने
तुझे
लुप्त होणे..
मुश्किल करते
माझे जिणे..
जीवन जैसे
क्षणात उणे..
अन
नशिबी येते
केवळ झुरणे..!!
**$p..✍🏼

No comments:

Post a Comment