|| पहाट ||
|| पहाट ||
======
कैक रात्री जागून
मी अजूनही उभा दारात
तिच्या स्वागतास..
पण
ती व्यस्त दिसतेय गोंजारण्यात
त्यांच्या
भरलेल्या पोटास..!!
ना मावळली माझी आस
ना पोटात एक घास
मी पाहतोय साश्रु नयनांनी
नित्य तिचीच वाट..
नाही अजून फिरकली
दारात
माझ्या स्वप्नांची
ती रम्य पहाट..!!
***सुनिल पवार..
✍🏼
😊सुप्रभात
😊
No comments:
Post a Comment