|| खोड ||
|| खोड ||
=======
शिकायला हवं झाडांकडून
त्यांची खोडं
एकमेकात
बेमालूम मिसळून
एकमेकांस
भक्कम आधार देतात..
आणि
माणसाची खोंड
एकमेकात
नकळत तंगड्या टाकून
एकमेकांस
तोंडघशी पाडतात..
सुटता सुटत नाही
ही माणसाची
जडलेली
सवयीची वाईट खोड..
अन
तुटता तुटत नाही
झाडांची
आधाराची पकड अजोड..!!
***सुनिल पवार...
✍🏼
No comments:
Post a Comment