Wednesday, 1 February 2017

|| "म" मैत्रीतला ||

💝तिच्यातील ती💝
==============
|| "म" मैत्रीतला ||
===========
ती
मानते मला मित्र
आणि
सांगते सारं मनातलं..
मी ही जपतोय
"मैत्रीतला म"
तिला
आश्वस्त करत
दाखवून दिलंय
तसा मी ही
बहिराचं आहे
मला
ऐकू येत नाही
मुळीच
माझ्याच मनातलं..!!
****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment