|| नेत्रसुखद ||
=========
नकळत
स्पर्शून जातो
अंगास
अबोल वारा..
फुलवीत रोमांच
तनुवर
उठवीत शहारा..!!
फितूर
झाली नजर
करीतसे
मातीस इशारा..
हृदयी
उमटवीत ठसे
मोर नाचे
फुलवीत पिसारा..!!
पाहताच तीला
मंत्रमुग्ध मी
ती
बहर ल्याली वसुंधरा..
डौल
तिचा न्यारा
भासतसे नेत्रसुखद
रमणीय नजारा..!!
***सुनिल पवार...
No comments:
Post a Comment