पण हल्ली..
भिजणे आणि रुजणे
तुला चांगलेच जमते
पण हल्ली तू तशी भिजत नाही
आणि मनासारखी रुजतही नाही..!!
नकळे मातीला कोणत्या कॉन्क्रीटचा,
की डांबराचा अडथळा आहे?
पण तो कोसळतोय अविरत
अन् पाण्याचा निचराही होत नाही..!!
उन्ह पावसाचा खेळही
हल्ली म्हणावा तसा रंगत नाही..
भंगलेल्या त्याच्या स्वप्नांना
इंद्रधनूची कुठे संगत नाही..!!
कदाचित हेच कारण असेल
त्याच्या रागाचं अन् कोसळण्याचं
आता पूर्वीसारखा सुसंवाद घडत नाही
अन् आकाश धरेचं मिलन होत नाही..!!
--सुनिल पवार...

425
People Reached
26
Engagements
No comments:
Post a Comment