Saturday, 10 August 2019

कसं सांगू तुला...

कसं सांगू तुला...

कसं सांगू तुला
पावसाचे येणे तसे अनाठायी नसते..
धरणीवरचे प्रेम
त्याच्या ठायी ठायी असते..!!
समजून घेशील तर कळेल तुला
नदीचा आवेग काय असतो..
तिला सामावून घेण्यास
सागरही तितकाच
आतुर अन् उत्सुक दिसतो..!!
वाऱ्याचा खोडकर पणा
कदाचित तुला रुचणार नाही..
पण त्याच्या लयीत झुलणाऱ्या
कोवळ्या कोंबाना पाहून,
तुझं देहभान हरपल्याशिवाय राहणार नाही..!!
एकदा भिजून बघच
मग कळेल तुला स्पर्शाची सुखद अनुभूती..
गंध श्वासात भरून तू होशील जेव्हा धुंद
तेव्हा उमजेल तुला
काय असते खरी नादावणारी प्रीती..!!
--सुनिल पवार..✍️
Image may contain: text that says 'कसं ांगूतुला पावसाचे येणे तसे अनाठायी नसते.. धरणीवरचे प्रेम ठायी असते..!! समजून घेशील तर कळेल तुला नदीचा आवेग काय असतो.. तिला सामावून घेण्यास सागरही तितकाच आतुर अन्उत्सुक दिसतो..!! ।।कसं सांगू तुला|| वाऱ्याचा बोडकर पणा कदाचित तुला रुचणार नाही.. त्याच्या लयीत झुलणाऱ्या कोवळ्याकोंबाना पाहून, देहभान हरपल्याशिवाय राहणार नाही..!! एकदा भिजून बघच मग कळेल तुला स्पर्शाची सुखद अनुभूती.. श्वासात तू होशील जेव्हा धुंद तेव्हा उमजेल तुला काय असते खरी नादावणारी प्रीती..!! सुनिल पवार..'
220
People Reached
15
Engagements
12

No comments:

Post a Comment