Saturday, 10 August 2019

काही फरक पडला नाही...

काही फरक पडला नाही...
किती सिंचले पाणी तरी
काही फरक पडला नाही..
सुकून गेले फुल प्रेमाचे
झाडाने गळा काढला नाही..!!
फुलच फटकून वागले
दोष झाडाने दिला नाही..
गेले उडून ते वाऱ्यावर
गंधही मागे उरला नाही..!!
सजले जरी फुल राऊळी
कोण सांगेल सुकणार नाही..
कोण भरवसा देईल त्याचा
कुणा माढ्यावर चढणार नाही..!!
रंग रूपाचे आयुष्य किती
याची कुठेच हमी नाही..
क्वचित भेटतील देव फुलास
पण झाडास फुलांची कमी नाही..!!
--सुनिल पवार..✍️

No comments:

Post a Comment