तिर्थरूपी दूध..
आचळ्या पिळून थेट ओठाला लावलेल्या
दुधाची एलर्जी असते काहींना
त्यात पाणी घातल्याशिवाय
ते पचत नाही त्यांना..!!
दुधाची एलर्जी असते काहींना
त्यात पाणी घातल्याशिवाय
ते पचत नाही त्यांना..!!
इथे शहरात थेट दूध मिळत नाही
त्यासाठी बरीच पायपीट करावी लागते
पण तरीही काहींचा समज असतो की
आमची दुधाची तहान ताकावर भागते..!!
त्यासाठी बरीच पायपीट करावी लागते
पण तरीही काहींचा समज असतो की
आमची दुधाची तहान ताकावर भागते..!!
पूर्वी तबेल्यातून भैय्या यायचा
रतीब घालायला
माहीत असायचं
तो दुधात पाणी घालतो
पण तरीही तो नाही आला की,
जीव कासावीस व्हायचा..!!
रतीब घालायला
माहीत असायचं
तो दुधात पाणी घालतो
पण तरीही तो नाही आला की,
जीव कासावीस व्हायचा..!!
मग आम्ही
सरकारमान्य बाटली/पिशवीबंद
दूध घेऊ लागलो
पण साली त्यातही भेसळ
कितीही आटवलं तरी
सायीचा कुठे पत्ता नसतो
आणि पावडरच्या दुधावर तर
बोलायची सोय नाही
मलाही ते फारसं रुचत नाही..!!
सरकारमान्य बाटली/पिशवीबंद
दूध घेऊ लागलो
पण साली त्यातही भेसळ
कितीही आटवलं तरी
सायीचा कुठे पत्ता नसतो
आणि पावडरच्या दुधावर तर
बोलायची सोय नाही
मलाही ते फारसं रुचत नाही..!!
तर सांगायचं मुद्दा हा की,
दूध सकस असो वा बेचव
पाणी असो वा नसो, कसंही असो
तथाकथित तिर्थरूपांना
त्याची कायम एलर्जीच असते..!!
दूध सकस असो वा बेचव
पाणी असो वा नसो, कसंही असो
तथाकथित तिर्थरूपांना
त्याची कायम एलर्जीच असते..!!
पण तेच सदाकुथीत तीर्थरूप
सकाळीच गुत्ते शोधून
वर मनमुराद उतारा ढोसून
जेव्हा दुधाच्या अ-सकसतेवर
डुलत डुलत भाष्य करतात
तेव्हा ऐकणाऱ्याच्या नाकाचे केस करपतात
हे सुद्धा त्यांच्या गावी नसते..!!
सकाळीच गुत्ते शोधून
वर मनमुराद उतारा ढोसून
जेव्हा दुधाच्या अ-सकसतेवर
डुलत डुलत भाष्य करतात
तेव्हा ऐकणाऱ्याच्या नाकाचे केस करपतात
हे सुद्धा त्यांच्या गावी नसते..!!
असो...
--सुनिल पवार...✍️
--सुनिल पवार...✍️
No comments:
Post a Comment