मनात खोलवर...
झाड
केव्हाच उन्मळून पडलंय
पण
मनात खोलवर रुजलेल्या
त्या मुळांचा शूल
अजून टोचतोय
शब्दशर बनून जाचतोय..!!
मी काढला नाही अजूनही
नाही काढणार कधी
आता
इतकीच तर आठवण उरलीय
पुन्हा धरेल कधीतरी हिरवळ
तुज साधण्या शर संधान
झाड छिन्न विच्छिन्न होईल
निदान तेव्हा तरी होईल
तुझ्या मनाचे समाधान..!!
--सुनिल पवार...✍️
No comments:
Post a Comment