Tuesday, 26 July 2016

|| स्तोम ||

स्तोम..
कितीही बोला पोटतिडकीने
बोलणे रुचेलच असे नाही..
रुचलेच कधी चुकून जरी
तरी ते पचेल असेही नाही..!!
जिथे पाहावे तिथे नुसती हातघाई
निष्क्रिय कृती अन् शाब्दिक लढाई..
बोलायची तर सोय उरली नाही
म्हणूनच तर मी काहीच बोलत नाही..!!
म्हणा लोकहो, तुम्ही खुशाल म्हणा
हे काही सबळ कारण नाही..
तसंही शब्दांशीवाय माझ्याकडे
ठेवण्याजोगे प्रबळ तारण नाही..!!
पण तेही तरणार नाही ठाऊक आहे
त्यासाठीच तर काही बोलायचे नाही..
मुद्दा पटो ना पटो हा भाग पुढचा
पण शब्द नाहक सांडले जातील
ही भीतीही माझी अनाठायी नाही..!!
कारण झोपलेल्यास उठवता येते
पण झोपेचं सोंग घेणाऱ्याच काय..?
ही वृत्तीच अशी खेकड्याची आहे की..
कळणारही नाही
कधी गुपचूप खेचतील पाय..!!
तरीही मन मारून मी मांडू पाहतोय
घुसमटलेल्या मनाचे निर्भीड विचार..
पण साशंक आहे अजूनही
की करेल का कोणी (स)त्याचा स्वीकार..?
कारण काय लिहितोय ह्यापेक्षा आता
कोण लिहितोय/बोलतोय याला महत्व आलय..
व्यक्ती पूजेचंच स्तोम सर्वत्र माजतेय
अन् भक्तांच्या मांदियाळीत
नसलेल्या देवाचं चांगलंच फावतंय..!!
--सुनिल पवार...✍️

|| क्षणभंगुर ||

|| क्षणभंगुर ||
=◆=◆=◆=◆=
खुप काही करायचे असते
पण खूप काही राहून जाते..
जीवनाच्या राहाट गाड्यात
जगणे निखळ वाहून जाते..!!

भविष्याच्या विश्रांतीसाठी
शरीर नित्य धावत राहते..
संपत नाही शर्यत कुठेच
उमेदीस मात्र दुरावत राहते..!!
कैक स्वप्ने नजरेत असतात
म्हणून रात्रीचाही दिवस होतो..
पण किती स्वप्न साकार होतात?
अन कितीसी सुखाची झोप घेतो..!!
आयुष्य सारे रंगवण्यात जाते
अंधारा शिवाय कुठे काय उरते..?
असो कुंचला जरी सोन्याचा
त्याचेही चित्र क्षणभंगुर ठरते..!!
🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
*****सुनिल पवार..........

|| जीवन ||

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
=================
जीवन एक
संघर्ष आहे..
कधी दुःख ,
कधी हर्ष आहे..!!
कधी पाझर,
कधी रुक्ष आहे..
कधी बेसावध
कधी दक्ष आहे..!!
जीवनाचा हाच
परामर्ष आहे..
जीवन मखमली
स्पर्श आहे..!!
***सुनिल पवार..🌹

|| खबर खोद के || (परिवहन मंत्री म्हणले)

|| खबर खोद के ||
============
परिवहन मंत्री म्हणले
हेल्मेट नाय तर
दुचाकीवाल्याला पेट्रोल नाय..😜
आम्ही कुठं हो म्हणतोय
निर्णय चुकीचा हाय..?😜
पण त्यात भी लफडं असं हाय
पेट्रोल पंपाच्या बाजूला
भाड्यानं हेल्मेट देणाऱ्यान
दुकान बसवलं नाय म्हणजे मिळवलं
आज काल बाबो 😜
कुणाचा बी काय नेम नाय..!!😜
मंत्री बी आपलाच हाय
अन सरकार बी आपलंच हाय
काय कळलं का न्हाय..??😜
****सुनिल पवार....😀

|| पाऊस पसारा ||

|| पाऊस पसारा ||
============💦
यासम नाही
कोणी दुसरा..💦
आयुष्य जसे
पाऊस पसारा..💦
कधी मोहक
इंद्रधनुचा नजारा..💦
कधी भासतो
चिखल सारा..!!
***सुनिल पवार..💦
🌺सुप्रभात🌺

|| आयुष्य ||

|| आयुष्य ||
========
आयुष्य म्हणजे
एक प्रवास..
🏃🏻🏃🏻
सुख दुखाःचा
संमिश्र सहवास..!!
👫
चढ उतार
जरी मार्गात..
👣👣
आयुष्याचा देते
अनुभव खास..!!
🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
🌺सुप्रभात🌺
****सुनिल पवार...

Wednesday, 20 July 2016

|| लाईमलाईट ||

|| लाईमलाईट ||
===========
काल आमच्या कपिलेला
कालवड झाली..
बातमी तीनं
व्हाट्सअपवर टाकली
समदी गुरं जमून आली
आनं
शुभेच्छांची मांदियाळी झाली..!!

म्या म्हणलं कपिलेला
बरं जमतंय तुला..
काय म्हणत्यात ग ह्याला..??
तर ती म्हणली मला
तुला न्हाय समजणार
"लाईमलाईट" म्हणत्यात त्याला
जपावं लागतंय बघ स्टेटसला..!!
म्या म्हणलं तिला
पण उपेग काय ग त्याचा
ते येणार व्हय बाराश्याला..??
तर म्हणली ती
नाय बा,
पण लै अप्रूप असतंय बघ
हवशा, नवश्या गवश्याला..!!
शेजारच्या ढवळ्याचा
आजच बा खपला
तर त्यानं आधी
स्टेटस अपडेट केला..
म्या म्हणलं,
आरं आदूगर पोचीव बा ला
तर म्हणला त्यो
मंग साले हो
सांगा तुम्ही कशाला..??
म्या म्हणलं,
आम्ही आहोतच रं
पण निदान
दुःख दाखीव तरी जगाला
म्हणला त्यो,
तेच तर करतोय..
रडल्याची स्मायली टाकतोय
बघ ना जरा डोळे फाडून
जो तो कसा
श्रद्धांजली वाहतोय..!!
म्या म्हणलं,
आरं पण उपेग काय त्येचा
येणार हाईत का ते
तुझ्या बा ला पोचवायला..??
म्हणला त्यो न्हाई
पण स्टेटस हवं जपायाला
समजायचं न्हाय गड्या तुला
लाईम लाईटमंदी हवं ऱ्हायाला..!!
****सुनिल पवार....😜

ऐसें गुरू ऐसें शिष्य...

ऐसें गुरू ऐसें शिष्य...

शिष्याशिष्यात भेद केला
ऐसा गुरू मी देखिला।
एकाच्या भल्यासाठी
दुसऱ्याचा बळी दिधला।

तरीही गुरु वंदिला
नाही त्याने अव्हेरला।
गुरु दक्षिणेत क्षणे
अंगठा नजर केला

शिष्य तो आजण
एकलव्य महान।
गुरुभक्तीने त्याच्या
गहिवरले द्रोण मन।

शिष्य अनोखा कर्ण
अडथळा तयास वर्ण।
घाव सोसून शब्दांचा
झाला विफल विदीर्ण।

गुरु ते सर्वज्ञानी
का जाणिले ना त्यांनी।
तेज सूर्य पुत्राचे
ऐसे झाकोळले कोणी।

अन्याय जरी जाहला
ना कर्तव्यास चुकला।
शाप हसत झेलूनी
जगी मृत्युंजय ठरला।

विपरीत जरी दिसले
गुरू शिष्याचे हे नाते।
निस्सीम गुरुभक्तीने
धन्य जाहले गुरुही ते।
--सुनिल पवार...✍️
415
People Reached
23
Engagements
19
1 Share
Like
Comment
Share

Monday, 18 July 2016

|| एल्गार ||

निषेध
=========
|| एल्गार ||
=======
कवने झाली अपार
कुठे मिटला अंधार..
पोकळ सारे शब्द ते
फसवा त्यांचा आधार..!!

घृणा आणतोय आता
मेणबत्तीचा शृंगार..
राख झाल्या भावनांचा
विझून गेला अंगार..!!
पुरे झाली पूजा तुझी
नको चढवू तू हार..
कळ्या कळ्या कुस्करून
असा मांडलेला बाजार..!!
बेगडाच तुझ्या मुखी
माणुसकीचा प्रचार..
लांडग्याची भूक तुझी
अन हिंस्र अत्याचार..!!
कधी जागणार सांग
कधी मिटेल अंधार..?
पाशवी कृत्याविरुद्ध
कधी होईल एल्गार..??
🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
****सुनिल पवार....

Friday, 15 July 2016

|| मन पांडुरंग ||

II आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा II
=========================
|| मन पांडुरंग ||
==========
मन पांडुरंग। जीवन अभंग।
घडो संत संग। मजलागीं।।
घातले रिंगण। सुख दुःख दोन
चित्ती लागो ध्यान। पांडुरंगा।।
डोईवर भार। झालासे आधार।
तुळस साकार। अंगणात।।
डोहात काजळ। सापडेना तळ।
जीवन उजळ। व्हावे देवा।।
माय चंद्रभागा। सगुणाचा धागा।
हृदयात जागा। शोधतसे।।
युगे अठ्ठावीस। एक एक दिस।
लाभावा परीस। दर्शनाचा।।
🙏🏽🌹🙏🏽
--सुनिल पवार...✍️

|| उत्तर ||

|| उत्तर ||
=◆=◆=
माझ्या प्रत्येक
का च उत्तर
कदाचित आज
तुझ्याकडे नसेल.?
पण
कधीतरी चुकून
आलीस
मार्गावर माझ्या
तर
तुलाही त्याची
गरज भासेल..!!
***सुनिल पवार...🙂

|| कसम से ||

|| कसम से ||
=◆=◆=◆=◆=
ना रखो कोई उम्मीद
तुम ख़ुशी की हम से
जोड़ा है रिश्ता हमने
अब गम से, कसम से..!!

बहलाओ ना दिल
अब कोई खिलोनो से
हर कोई खेला है यहाँ
हमारे दिल से, कसम से..!!
मत दो दिलासा अपनेपन का
न बांधो गाठ कोई सपनो से..
टूटा है हर सपना यहाँ
लगी चोट अपनोसे, कसम से..!!
चार दिन की यह जिंदगी
ना जी सके हम ढंग से
कैसे कहु के हैरान हूं
बदलते आप के रंग से
कसम से..!!
*****सुनिल पवार....😊

Tuesday, 12 July 2016

II चहरे II

II चहरे II
======
माणूस जरी एक
माणसा माणसाचे
चहरे अनेक..
प्रत्येक चेहऱ्याचे
पैलू अनेक..
काही नेक,
काही दिल फेक..
काही राकट बेरकी,
काही कोमल सुरेख..
सृष्टित भरून
असे रंग अनेक..
जसे नभातले
इंद्रधनु एक..
मी ही त्यातलाच
चेहरा एक..!!
***सुनिल पवार...

|| मेघ मल्हार ||

|| मेघ मल्हार ||
==========
कृष्णमेघांच्या स्वागता
सजले नभाचे द्वार..
सौदामिनीचा लखलखाट
वारा गातसे मेघ मल्हार..!!

सरीवर लेवुन सरी
आला आषाढ़ अंगणी..
हिरवळल्या सृष्टीवरी
राज्य करी वर्षा राणी..!!
मन मोर नाचतो वनी
तरळे आनंदाश्रू नयनी..
तृप्त होतो चातक
थेंब थेंब पिऊनी..!!
वाफाळल्या धारित्रीची
गंधित होते माती..
डिर कोवळा खेळवे ती
वाऱ्याच्या झुल्यावरती..!!
भक्तीचा मळा फुलतो
विठुरायाच्या द्वारी..
नाचतो डोलतो पांडुरंग
मन मनाच्या गाभारी..!!
****सुनिल पवार...💦

Friday, 8 July 2016

II पलटवार II

II पलटवार II
========
आज कामावरुन येऊन फ्रेश होऊन ज़रा निवांत व्हाट्सअप चाळत बसलो तोच आमच्या सौ म्हणाल्या, आज तुमच्या चिरंजीवाने एक प्रताप केलाय.. मी चिरंजीवाकड़े डोळे वटारुन बघत म्हणालो आता काय केले उपद्याप..?? त्यावर सौ उत्तरल्या..तुम्ही आणलेल्या नविन छत्रीचा दांडा मोडला.. (एक छद्मी कटाक्ष टाकत पुन्हा) कसली भंगार छत्री आणलीय देव जाणे.. मी तिच्या त्या खोचक बोलण्यावर तितकेच खमके उत्तर देत म्हणालो..ब्रांडेड छत्री आहे ती..दुकानातुन खरेदी केलेली..बिल सुद्धा आहे.. हो ना मग तुटली कशी..?? सौ. ने पुन्हा त्याच खोचकतेने प्रतिप्रश्न केला..तिच्या प्रतिप्रश्नावर मी चिरंजीवाकड़े कटाक्ष टाकत उत्तरलो..माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर काय होणार..?? आगच लागणार ना..?? माझे ते उत्तर ऐकून सौ गप्प झाल्या..मात्र चिरंजीव मारक्या म्हशी सारखा बघत गप्प बसून राहिला..
थोड़ा वेळ गेला..वातावरण हलके झाले..तसा चिरंजीव उठला आणि मला हळूच म्हणाला पप्पा तुमचा कोणता चष्मां खराब झाला आहे..?? (कोपऱ्यात काढून ठेवालेल्या जुन्या चष्म्याकड़े बोट दाखवत) हा चष्मां की तुम्ही आता चढवला आहे तो चष्मां..? मी सहज म्हणालो तो..अरे हां आता घातला आहे तो नविन आणला नाही का मी..?? (कोपऱ्यातल्या चष्म्याकडे बोट दाखवत) तो चष्मां खराब झालाय..त्याने भुरकट दिसत होते.. माझ्या उत्तरावर चिरंजीव पटकन म्हणाला मग बरोबर छत्री तुटणारच ना..?? तुम्ही छत्री आणली तेव्हा हा नविन चष्मां कुठे होता..?? खी..खी..खी...
आता बोला..😀
****सुनील पवार.....

:::II कंपूशाही II:::

[मिश्किली]😜
***********
:::II कंपूशाही II:::
===========
कंपूशाहीचा निषेध करून..
त्यांनी
नवा कंपू तयार केला..
आता
त्यांच्या कंपूशाहीत
इतरांचा
जीव घुसमटला
मग इतरानीही
कंपूशाहीचा निषेध करून
आपला
नवा कंपू तयार केला..!!
****सुनील पवार.....😀

:P व्हाट्सअप/फेसबुक रायता :P

=D हसु नका बरे =D
============
आजची रेसिपी
============
:P व्हाट्सअप/फेसबुक रायता :P
======================
साहित्य:
1) वाह वाह
2) सुंदर
3) खुप सुंदर
4) मस्त
5) छान
6) जबदस्त
इत्यादी शब्द
किंवा एखाद दूसरी चारोळी
7) दोन चार गुलाब अथवा पुष्प गुच्छ

कृती :
आपल्या आवडीच्या एखाद्याची किंवा एखादीची
एक रचना किंवा पोस्ट घ्यावी..त्यावर वाह वाह, छान, सुंदर इत्यादी शब्दाची खमंग फोडणी द्यावी..दोन्ही अंगठे वर करून (Y) (Y) किंवा चिमटीत पकडून मस्त एकजीव करावी..सजावटीसाठी एखादी चारोळी पेरावी..अन बाजूला गुलाब 🌹 अथवा पुष्प गुच्छ 💐मांडावा..मस्त रायता तयार होईल शिवाय दिसायलाही सुंदर दिसेल..आता हा तयार झालेला रायता आपल्या आवडत्या व्यक्तीला अजीर्ण होईपर्यंत ती वाढत राहावा...म्हणजे बाकीच्यांना आपोआप मळमळू लागेल... =D :P
(चकोर दा ढाबा)

||पाऊस आला||

||पाऊस आला||
==========🌧
थकला भागला एक ढग
डोंगरावर विसावला💦
डोंगरलाही नकळत त्याचा
लळा लागला..💦
शीतल वाऱ्याने अलवार
छेडले मनाला..💦
अवचीत फुटला बांध
आले पाणी डोळ्याला..💦
अन लोक म्हणाले..
पाऊस आला ..💦
पाऊस आला..!!
****सुनिल पवार....
💧💦💧💦💧💦💧

|| भूमिपुत्र ||

|| भूमिपुत्र ||
========
झुंज घेऊन वाऱ्याशी
आम्ही जगतो बेफाम..
उभ्या रानाच्या कुशीत
अमुचे आलय धाम..!!

वाट जरी ही काट्याची
आहे आमच्या पोटाची..
बाभळीच्या संगे बोरी
गोड भाकरी कष्टाची..!!
झाड़ पाला माझा देव
आम्ही पूजितो त्याला..
ह्या भूमीचे भूमीपुत्र
नित्य वंदितो मातीला..!!
मोह आम्हा ना कशाचा
पशु पक्षी हेच धन..
बांबूच्या या खोपटात
राबतया समाधान..!!
हवा हव्यास कशास
भविष्याचा घ्या कानोसा..
दुष्काळ सापेक्ष उभा
हिरवाईचा घ्या वसा..!!
****सुनिल पवार....

=D याड लागलं लई ग्वाड लागलं =D

=D याड लागलं लई ग्वाड लागलं =D
=====================
फ़ोटोच्या नादापायी
त्यांनी झाड लावले..
झाडापेक्षा फोटोनेच
त्यांना याड लावले..!!


काही का होईना
एक झाड लागलं..
त्यांचं झाड लावणं
मनास ग्वाड लागलं..!!
😄😜😄😜😄
***सुनिल पवार...

Tuesday, 5 July 2016

|| ठाऊक नसावे त्याला ||

|| हे ठाऊक नसावे त्याला ||
================
तो घेऊन आला पुन्हा
जुन्या ओल्या आठवणीला..
आतासा रोजच मी भिजतोय
हे ठाऊक नसावे त्याला..!!
कधी रिमझिम तर कधी बेधुंद
तो खेळवतो अवखळ वाऱ्याला..
आतासा जीवनाचाच खेळ झालाय
हे ठाऊक नसावे त्याला..!!
इंद्रधनू फुलवतो सप्तरंगाचे
तो नटवतो साऱ्या सृष्टीला..
आतासा रंगहीन जगतोय माणूस
हे ठाऊक नसावे त्याला..!!
कधी गरजतो तर कधी बरसतो
तो कधी पाचारितो सौदामिनीला..
आतासा सुनासुना वाटतोय पाऊस
हे ठाऊक नसावे त्याला..!!
--सुनिल पवार..✍️
भारत जगताप, Vrushali Sanap Kale and 14 others
8 Comments
Like
Comment
Share