Tuesday, 12 July 2016

|| मेघ मल्हार ||

|| मेघ मल्हार ||
==========
कृष्णमेघांच्या स्वागता
सजले नभाचे द्वार..
सौदामिनीचा लखलखाट
वारा गातसे मेघ मल्हार..!!

सरीवर लेवुन सरी
आला आषाढ़ अंगणी..
हिरवळल्या सृष्टीवरी
राज्य करी वर्षा राणी..!!
मन मोर नाचतो वनी
तरळे आनंदाश्रू नयनी..
तृप्त होतो चातक
थेंब थेंब पिऊनी..!!
वाफाळल्या धारित्रीची
गंधित होते माती..
डिर कोवळा खेळवे ती
वाऱ्याच्या झुल्यावरती..!!
भक्तीचा मळा फुलतो
विठुरायाच्या द्वारी..
नाचतो डोलतो पांडुरंग
मन मनाच्या गाभारी..!!
****सुनिल पवार...💦

No comments:

Post a Comment