Friday, 8 July 2016

|| भूमिपुत्र ||

|| भूमिपुत्र ||
========
झुंज घेऊन वाऱ्याशी
आम्ही जगतो बेफाम..
उभ्या रानाच्या कुशीत
अमुचे आलय धाम..!!

वाट जरी ही काट्याची
आहे आमच्या पोटाची..
बाभळीच्या संगे बोरी
गोड भाकरी कष्टाची..!!
झाड़ पाला माझा देव
आम्ही पूजितो त्याला..
ह्या भूमीचे भूमीपुत्र
नित्य वंदितो मातीला..!!
मोह आम्हा ना कशाचा
पशु पक्षी हेच धन..
बांबूच्या या खोपटात
राबतया समाधान..!!
हवा हव्यास कशास
भविष्याचा घ्या कानोसा..
दुष्काळ सापेक्ष उभा
हिरवाईचा घ्या वसा..!!
****सुनिल पवार....

No comments:

Post a Comment