ऐसें गुरू ऐसें शिष्य...
शिष्याशिष्यात भेद केला
ऐसा गुरू मी देखिला।
एकाच्या भल्यासाठी
दुसऱ्याचा बळी दिधला।
तरीही गुरु वंदिला
नाही त्याने अव्हेरला।
गुरु दक्षिणेत क्षणे
अंगठा नजर केला।
शिष्य तो आजण
एकलव्य महान।
गुरुभक्तीने त्याच्या
गहिवरले द्रोण मन।
शिष्य अनोखा कर्ण
अडथळा तयास वर्ण।
घाव सोसून शब्दांचा
झाला विफल विदीर्ण।
गुरु ते सर्वज्ञानी
का जाणिले ना त्यांनी।
तेज सूर्य पुत्राचे
ऐसे झाकोळले कोणी।
अन्याय जरी जाहला
ना कर्तव्यास चुकला।
शाप हसत झेलूनी
जगी मृत्युंजय ठरला।
विपरीत जरी दिसले
गुरू शिष्याचे हे नाते।
निस्सीम गुरुभक्तीने
धन्य जाहले गुरुही ते।
--सुनिल पवार...

415
People Reached
23
Engagements
No comments:
Post a Comment