Thursday, 30 July 2015

|| माझ्या मनाचा कुंभमेळा ||

|| माझ्या मनाचा कुंभमेळा ||
==================
कुंभमेळ्यात का हो
साधुंची शाही बड़दास्त..??
वैराग्यांच्या अंगी का
विकार असेही असतात..!!


कोठुन कोण येतात
नक्की साधू किती असतात..??
माझ्या डोळ्यांना का मग
ते संधी साधू भासतात..!!

म्हणतात जन सारे
मेळ्यात पाप धुतली जातात..
माझ्या मनाचा प्रश्न हा
मुळात पापं कसली असतात..!!

धुवायची असतील जर पापं
तर दिनदुबळ्यांची करा सेवा..
पाप धुण्या कशास तुम्हा
गोदा तट हा हवा..??

मनाचा हा मैल सारा
पाण्याने धुपणार कसा..??
अशुद्ध होतंय पाणी अन
तळमळतोय पाण्यात मासा..!!

राबतो ह्यांच्या मागे कशास
नाहक सरकारी गराडा..
ह्यांच्या सेवेसाठी होतोय
जनतेच्या पैशाचा चुराडा..!!

श्रद्धा असू दया मनात सारी
नको उदो उदो बाजारी..
का फिरतोय आपण दारोदारी
ईश्वर वसलाय तो मनमंदिरी..!!
*******सुनिल पवार.....

Wednesday, 29 July 2015

|| विचार मी करतोय ||

|| विचार मी करतोय ||
===============
विचार मी करतोय
पाहा पटतो का तुम्हाला..
एक अनोखी भेट
मिळेल तुमच्या पाल्याला..!!

विचारा तर कसं..??
सांगतो तेच तुम्हाला..
करायचं फक्त इतकंच
मुला मुलीच्या वाढदिवसाला..!!
बदलायची जरा जागा
सोडायच भव्य सभागृहाला..
निवडायचं एक अनाथालय
बोलवायचं तिथे परिवाराला..!!
कारण बनेल तेच
बालकांच्या हास्याला..
आशीर्वाद अनमोल
मिळतील तुमच्या पाल्याला..!!
पारावार नसेल
तुमच्या,त्यांच्या समाधानाला..
खात्री आहे मला
हे पटेल नक्की तुम्हाला..!!
छोटासा एक विचार
बदलेल त्यांच्या जीवनाला..
आनंदाचा निर्झर झरा
सांधेल निरागस मनाला..!!
संस्कारचे सुंदर मोती
लागतील अलवार रुजायला..
भविष्याच्या भाळी मग
लागेल माणुसकी सजायला..!!
*****सुनिल पवार.....

|| भिक नको पण ||

|| भिक नको पण ||
============
वाहतात पहा कसे
मतलबी राजकारणी वारे..
तुटतात पहा कसे
त्यांच्या अकलेचे तारे..!!

म्हणतात हे महाभाग
प्रेम करून शेतकरी मेले..
कळेना मला काही
ह्यांना मंत्री कुणी केले..!!

प्रेम करून मरायला
ते काय लैला मजनू वाटले..
बरळलात तुम्ही अन
आमचे काळीज फाटले..!!

शेंबड़ पोर ही सांगेल
पिचल्या शेतकऱ्यांच्या व्यथा..
उंटावरच्या शहाण्यांनो
कसल्या लिहतायं कथा..!!

किती सोसावं बळीराजानं
मळभ मनात रोजच दाटतं..
भिक नको पण कुत्रं आवर
आता मला म्हणावसं वाटतं
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.......

Tuesday, 28 July 2015

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
==============
होता एक तेजस्वी तारा
भारत मातेचा दुलारा..
अग्निपंखी गरुड़ भरारा
जन मनातला प्यारा..!!

ध्येय वेडा जिद्द उरात
देश प्रेम नसा नसात..
विज्ञानाचा असीम प्रेमी
मिसाईल मँन तो साक्षात..!!
विद्यार्थ्यांचा मित्र सखा
आदर्श शिक्षकी जपला वसा..
बालकापरी निरागस हास्य
कृतीतुन उलघडे स्वप्निल भाष्य..!!
देशासाठी महान योगदान
ना सोडले कधी ज्ञानदान..
जगात भरून त्यांची किर्ती
संयमी सफल होते राष्ट्रपती..!!
चटका लावून गेले मनास
ना होणे कोणी डॉ.कलाम
त्याच्या परी तेच एक महान
कर्तुत्वास त्यांच्या माझा सलाम..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.......

Monday, 27 July 2015

|| विचार करा बाप हो ||

|| विचार करा बाप हो ||
===============
अनन्य जन्माची माता
म्हणून जीला पूजता..
त्या स्त्री बिजाला का हो
उदरात तुम्ही खुड़ता..??

जन्म तुम्ही ही घेतला ना
त्याच मातेच्या पोटी..??
मग काय हक्क तुम्हाला
सुनी करण्या ओटी..??

दीपक तुम्हास हवा मात्र
मग नको का जोती..??
उजेड कसा पाडाल सांगा
जेव्हा अंधारतील राती..??

विचार करा बाप हो
सक्षम असते बेटी..
दीपक निघेल दिवटा कधी
पण बेटी बनेल रोटी..!!

नष्ट करून मुलीला सांगा
कुठून आणालं सुन..??
नारी वीणा नर हो सारे
पडेल जग हे सुनं..!!
*****सुनिल पवार....

|| विठ्ठला ||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!
=======================
विठ्ठला...
तुझ्या भेटीसाठी देवा जीव वेडावला..
भक्ता भेटीसाठी ईथे विठु विसावला..!!
वाट तुझी धरली देवा आलो पंढरपुरी..
एकादशी दिनी द्वारी जमले वारकरी..!!
पाहण्यास हा सोहळा सागर लोटला..
चंद्रभागेच्या तिरी मज विठू भेटला..!!
सुखावलो पांडुरंगा पारणे फिटले..
दर्शनाने तुझिया सारे कष्ट मिटले..!!
आशीर्वाद लाभों आम्हा नित्य तुझा देवा..
संत सहवास घडो कृपा दृष्टी ठेवा..!!
--सुनिल पवार...✍️

|| सावळे सुंदर ||

|| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ||
========================
सावळे सुंदर..

सावळे सुंदर। रूप मनोहर।
हात कटीवर। विठ्ठलाचे।।

तुळशीच्या माळा। रुळतात गळा।
कपाळास टीळा। शोभतसे।।

हास्य मुखावर। भावे लीलाधर।
उभा विटेवर। युगे युगे।।

आम्ही वारकरी। करुनिया वारी।
आलो तुझ्या दारी। पांडुरंगा।।

पांडुरंगी ध्यान। मिळे समाधान।
द्यावे वरदान। भक्ता लागी।।
--सुनिल पवार..✍️

Friday, 24 July 2015

|| प्रवास स्वप्नांचा ||

|| प्रवास स्वप्नांचा ||
=============
पाहिली होती मी स्वप्न काही
काढली पुन्हा आठवणीची वही
साकारली किती काही कळेना
अस्पष्ट होती नोंदीची शाई..!!


दिला ताण मनाच्या चक्षुवर
स्वप्न उमटली अलगद नजरेवर
दिवा स्वप्नच ती फार होती
पटले मनास आज खरोखर..!!

होती तशीच स्वप्न मोठी
ओंजळ मात्र पडली छोटी
तरीही धावत होतो अविरत
खुणावत होती रोजी रोटी..!!

गाठले असेल शिखर कदाचित
वाटले मनास साकारले स्वप्न
का खरच साकारले..??
उरला मागे पुन्हा तोच प्रश्न..!!

प्रवास आपल्या स्वप्नांचा
अखंड असाच चालत असतो
कुठे एका वळणावर थबकतो
अखेरचा तो श्वास असतो..!!
******सुनिल पवार...

Wednesday, 22 July 2015

II एकत्र / विभक्त II

II एकत्र / विभक्त II
********************
काळ बदलला तसा एकत्र कुटुंब पद्धती लोप पावल्या..एकत्र म्हणण्यापेक्षा सर्व समावेशक कुटुंब पद्धती म्हटले तर वागावे ठरणार नाही..सर्व समावेशक अशा अर्थाने की त्यावेळी संपूर्ण चाळ, शेजारी पाजारी सुद्धा कुटुंबाप्रमाणेच वावरत होते..एकमेकांच्या सहाय्याला धावून जात होते..सुख दुखाःत सहभागी होत होते..
पण हळू हळू हे सर्व बदलत गेले..समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा शिरकाव झाला..ह्याचे मुख्य कारण म्हणजे..एक तर जागेचा अभाव आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..तुम्ही म्हणाल जागेचा अभाव पूर्वी सुद्धा होता तरी १५ माणसांच कुटुंब १८० चौरस फुटाच्या खोलीत रहात होते.. तुमच म्हणण सुद्धा बरोबर आहे..त्यावेळी जागा जरी छोटी असली तरी माणसाचं मन आणि हृदय विशाल होते..त्यामुळेच सर्व गुण्यागोविंदाने नांदत होते..
काळानुरूप माणसाचं मन कोत बनलं..मग घर ते काय हो ते सुद्धा सहाजिक छोट बनलं..आणि हि लागण फक्त शहारापुरती मर्यादित नाही तर अगदी खेड्या पाड्यात गाव कुसा पर्यंत पोहचली आहे...गावातली विशाल घरे सुद्धा आज विभक्त होऊन कोंबड्याची खुराडी बनली आहेत व मनाने विखुरली गेली आहेत..सर्वच कुटुंबात स्वार्थाचा शिरकाव झाला अस मी म्हणणार नाही काही अपवाद सुद्धा आहेत..तर काहींनी सामंजस पणाने निर्णय घेवून विभक्त पण मनाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला..आणि तो स्तुत्य आहे..अस मी म्हणेन..
आता आपण दुस-या कारणाकडे वळू तो म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..मी आणि माझ त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब ह्या पलीकडे कसलाच विचार..ह्या वैयक्तिक स्वार्थ पाहणा-या व्यक्ती करत नाही..अशा कुटुंबाचा प्रवास खरे तर उजेडाकडून अंधाराकडे चालू आहे म्हंटल तर वागवे ठरणार नाही..कारण स्वतःच्या चार भिंतीत ह्यांच संपूर्ण जग सामावलेलं असत..ह्यांच्या शेजारी कोण राहतो ह्याचा सुद्धा त्यांना पत्ता नसतो..फ्लैट पद्धत सुरु झाल्याने सताड उघडे असणारे दरवाजे आता कायमचे बंद झाले..त्याच बरोबर मनाची कवाडं सुद्धा आपसूक बंद झाली..
आता तुम्ही म्हणाल विभक्त राहण्यात कसला आलाय स्वार्थ..?? तर त्याच अस आहे..सामंजसपणे घेतलेले निर्णय वेगळे..पण अट्टाहासाने नाहक कुरापती काढून निर्णयाप्रत येणे हे वेगळे..अशा निर्णयात मागाहून पच्छाताप करून घेण्याची पाळी येते..आणि सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते..त्यासाठीच इथे एक उदाहरण देऊ इच्छितो.. जे मी पाहिलं आहे..
दोन भाऊ आपल्या आई वडिलांसमवेत आणि त्याच्या अपत्यासह अगदी गुण्या गोविंदाने नांदत होते..पण आई वडील गेले आणि कुठून तरी स्वार्थी किडा एका भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनात शिरला..क्षणात होत्याचे नव्हते झाले..दोन्ही भाऊ विभक्त झाले..सहाजिक सुरवातीला दोघांनाही बरे वाटले..पण नंतर त्याना एकत्र राहण्याचे फायदे समजून आले तो पर्यंत उशीर झाला होता..ज्या कारणासाठी विभक्त झाले तेच कारण मुळावर आले.. कारण तस शुल्लक होत..म्हणे त्यांना एकांत मिळत नव्हता..तोच एकांत आज आकांत करतो आहे..माणसं जोडण्यासाठी अजूनही धडपतो आहे..माणसं जोडण्यासाठी अजूनही धडपडतो आहे...
सरते शेवटी इतकेच सांगेन शरीराने भले विभक्त रहा पण मनाने कायम एकत्र या..एकत्र रहा..
धन्यवाद...
सुनिल पवार...

|| अंकुरु दे बिज ||

|| अंकुरु दे बिज ||
××××××××××××
आलास तू पुन्हा
फुंकर मनावर घालायला
पण किती वेळ असणार
हे विसरु नको सांगायला..!!


तडा पडल्या मनाला
वेळ लागेल जरा सांधायला
पुन्हा फिरवलीस पाठ
तर नाही जमणार बांधायला..!!

वाहू दे आनंदाश्रु
लागू दे नाद्या वाहायला
तू सुद्धा थांब जरा
आनंद सोहळा पाहायला..!!

अंकुरु दे बिज पोटी
लागू दे ज़रा रांगायला
कळू दे जगास पुन्हा
तू लागला पावसासम वागयला..!!
******सुनिल पवार....

Tuesday, 21 July 2015

|| मी तुझीच रे ||

|| मी तुझीच रे ||
×××××××××××
आज अचानक कातर वेळी
नकळत ती समोर आली
ओळखले का तू मला..??
प्रश्न अचानक विचारती झाली..!!

म्हणालो मी नाही नाही
नक्की तू कोण ग बाई
उत्तरली ती सांगते सारे
करू नको रे उगाच घाई..!!

काय ओळख देऊ नक्की
म्हणू का, तुझ्या शब्दांची शाई
का भावनेची म्हणू उतराई
इतके पुरे का देऊ आणखी काही..!!

नको अशी तू कोडयात बोलू
समजेल असे बोल ग बाई
कुठे पाहिलय बर..??
मला कही आठवत नाही..!!

इतक्यात कसा रे विसरलास..??
गुंफत होतास ना तूच शब्दात
मिरवत होतास संमेलनात
लोक देत होते तुजला दाद..!!

भावनेत तू जवळ येतोस
विरहात कुठे दूर बैसतोस
कधी कारुण्याची किनार देतोस
कधी आठवणीत रममाण होतोस..!!

कधी तेज तलवार होतोस
कधी विनम्र हार होतोस
कधी हास्य फुव्वार होतोस
कधी कुणाचा आधार होतोस..!!

माझ्याच साठी ना तू हे करतो
तरी ही येईना तुज ओळखता
असा कसा रे तू विसरभोळा
मी तुझीच रे प्रिय कविता..!!
:
मी तुझीच रे प्रिय कविता..!!
***********सुनिल पवार.....

Monday, 20 July 2015

|| गेला पाऊस तो कुठे ||

|| गेला पाऊस तो कुठे ||
×××××××××××××××××
गुंजराव मनाचे माझ्या
मीच माझे ऐकतो
भरल्या डोळ्यांनी माझ्या
नित्य नभाकडे देखतो..!!

सुनी झाली झाडे सारी
सुन्या सुन्याच त्या वेली
हरवली कुठे सांगा
माझ्या मनाची माती ओली..!!

दाटल मळभ मनात
नाही आभाळ भरलं
माझ्या मनाच मळभ
आता डोळ्यात उतरल..!!

मूक झाले जणू पक्षी
दाणा गोटाही मिळना
गेला पाऊस तो कुठ
काही कळता कळना..!!
गेला पाऊस तो कुठ
काही कळता कळना..!!
******सुनिल पवार....

|| मेल्या पावसा ||

एक मालवणी प्रयत्न
×××××××××××××
|| मेल्या पावसा ||
===========
ह्यो मेलो पाऊस
खय रव्हला..
फटकी ईली त्याचेवर
अवकाळी व्हायला..!!
मेल्यान आंब्याची नासाडी केल्यान
आता भाताची करतलो..
नुकसान झाला जो आमचा
त्याचो काय, बापुस भरतलो..!!
हे देवा माजे रवळनाथा
आता तूच सांग माका..
खय भटकता ह्यो मेलो
तू पाहिलास का त्याका..!!
देवा तुजो भी धाक
आता त्याका रव्हलो नाय
हाता बाहेर गेलो तो
त्याका फुटलेत बघ पाय..!!
हे बारां गावच्या बापा पावसा
आता तुकाच नवस बोलतंय
मेल्या सोडान दे उनाडक्या
तुका हात जोडून विणावतंय..!!
--सुनिल पवार....✍️

Friday, 17 July 2015

|| मी कुठे म्हणतोय ||

|| मी कुठे म्हणतोय ||
××××××××××××××××
अहमहिका लागलीय जणू
टीका करायची
मी कुठे हो म्हणतोय
चुका करायची..??


कोण देवांवर करतोय
कोण रूढ़ी परंपरेवर
मी कुठे हो म्हणतोय
नाही बरोबर..??

त्या निमित्ताने का होईना
तो नामस्मरण करतोय
मी कुठे हो म्हणतोय
तोल ढासळतोय..??

कुणा माणासात दिसतोय
मुक्या प्राण्यात दिसतोय
मी कुठे हो म्हणतोय
देव असतोय..??

मनात तोही पूजतोय
मार्ग वेगळा धरतोय
मी कुठे हो म्हणतोय
वाईट करतोय..??

तुम्ही म्हणाल
हा असाही बोलतोय
अन तसाही बोलतोय
मी कुठे हो म्हणतोय
मी फ़क्त अनुभवतोय..!!
*****सुनिल पवार.....

Thursday, 16 July 2015

|| कुणी पाहिला का पाऊस ||

|| कुणी पाहिला का पाऊस ||
×××××××××××××××××××
कुणी पाहिला का पाऊस
कुठे भेटेल हो पाऊस
व्याकुळ झाल्या जीवाची
कशी पुरवावी मी हौस..!!


खुप दिवस झाले
इकडे फिरकलाच नाही
प्रेमाचा त्याच्या झरा
कुठे झिरपलाच नाही..!!

कुठे काळा ढग दाटतो
तो आल्या सारखा वाटतो
नुसतच ते सोंग ठरते
अन डोळ्यात पाऊस साठतो..!!

भेटला जर का कधी तुम्हास
निरोप माझा सांगा त्याला
पायधुळ एकदा झाडून जा
भरू दे माझ्या हर्षाचा प्याला..!!
*****सुनिल पवार.....

Wednesday, 15 July 2015

II संसद II

II संसद II
***********
संपवून आमची रसद..
सायबा दिलीस आम्हा संसद..
संसद म्हणावी का..??
का म्हणावी नुसती खदखद..!!

करून सवरून तुमच्याकडे 
सारेच अलबेल आहे..
आमच्या संसदेत मात्र
नित्याचीच घालमेल आहे..!!

तुमच्या संसदेत येते
लोकांभिमुख विधेयक..
आमच्या इथे मात्र
मलिद्याचे सर्व श्रेयक..!!

तुम्हीच दिलेल्या संसदेत
आम्ही अजूनही भांडतो आहे..
सत्ताधारी इंग्रज जणू
अशी भूमिकाच..
विरोधक मांडतो आहे..!!
****सुनिल पवार...


Monday, 13 July 2015

|| एक विचार ||

|| एक विचार ||
××××××××××
हवे कशास भेद माणासात
नसतो कोणी छोटा मोठा
माणूस असू दया फ़क्त माणासात
काढ़ा विचार मनातुन कोता..!!


हाताची बोटे छोटी मोठी
म्हणून कोणी छाटत नाही
कळतय ना हे तुम्हालाही
तरी का मग पटत नाही..!!

वळवुन पहा वज्र मुठ आपली
आजमावुन पहा तिची हिंमत
एक्जुटीच्या बळाची तुम्हा
कळेल तेव्हाच खरी किंमत..!!

कशास शोधता कोणात कमतरता
हृदयात आपल्या वसवा समता
पहा ज़रा त्या अजाण बालकांस
विचार खरा तो त्यांच्याच जाणता..!!

उतरवा डोळ्यावरून जातीयतेची पट्टी
सोडा आता धृतराष्टी विचार
नव्या महाभारताची नांदी ठरेल
अन्यथा तुमचा अविवेकी आचार..!!
********सुनिल पवार......

|| नभ झुला ||

|| नभ झुला ||
×××××××××
उंच झुला हा नभाचा
कोणी कसा ग बांधला..
कोण देत असे झोका
कुठे दोर तो बांधला..!!

सूर्य चंद्र खेळी मेळी
घेती मजेत तो झोका..
संगे ग्रह लाख तारे
साधतात ऐसा मोका..!!
निल नभाच्या झुल्यास
मऊ ढगांचा गालीचा..
वारा देत असे झोका
संगती ऋतुंच्या लीला..!!
अशी विधात्याची माया
कशी जाईल ती वाया
असा थाट अंबराचा
उंच झुला तो नभाचा..!!
*****सुनिल पवार....

|| गुज मनाचे ||

|| गुज मनाचे ||
××××××××××
नको सखे किंतु
नको मनी परंतु
अबोल माझे बोल
हृदयाने तोल तू..!!

बघ एकदा डोळ्यात
उतर प्रेमाच्या तळ्यात
उलझु नको नाहक
व्यर्थ प्रश्नांच्या जाळ्यात..!!
ग्वाही हीच देईन
निरंतर तुझा होईन
डोळ्यातून तुझ्याच
स्वप्न तुझेच पाहीन..!!
जपलय बघ उरात
प्रेम प्रीत सुमनाचे
गंधीत त्या श्वासांचे
ऐक गुज मम मनाचे..!!
***सुनिल पवार.....

Wednesday, 8 July 2015

II जुळू दे नव्या वाटा II

II जुळू दे नव्या वाटा II
**********************
आलेय बघ मी पुन्हा
तू ही ये आता..
रंगीत क्षितिजाच्या 
मार पुन्हा बाता..!!

पुन्हा जमव शब्दाचा
नवा फौज फाटा..
मी ही फसेन अलगद
असेना का खोटा..!!

येवू दे उधाण पुन्हा
थडकू दे त्याच लाटा..
शिणलेल्या मनात माझ्या 
रुजू दे प्रेम पाणवठा..!!

बहरू दे तोच गुलाब
नको खुडू त्याचा काटा..
दुभंगल्या मनाच्या रे
जुळू दे नव्या वाटा..!!
जुळू दे नव्या वाटा..!!
*******सुनिल पवार.....

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (५)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (५)
**************************
 २५)
पाळाल मनात
यशाची आसक्ती
प्रयानांची सक्ती
असावीच..!!
*****************
२६)
काय कमावले
काय गमावले
मोजमाप झाले
यशाचे ते..!!
×××××××××××
२७)
असावे मन ते
समाधानी नित्य
जाणून घ्या सत्य
यशाचे ते..!!
××××××××××
२८)
यशाचे निकष
लावावे ते कसे
मन माझे फसे
स्तुतीत का..!!
××××××××××
२९)
असतो का तोच
यशवंत एक
क्षेत्र ती अनेक
संधीतुनी..!!
××××××××××
३०)
नको हाराकिरी
यश मिळवण्या
मिळेल साधण्या
पुन्हा संधी..!!
×××××××××सुनिल पवार.........

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (४)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (४)
*****************************
१९)
रुजव मनात
प्रयत्नाचे झाड
यश फळ गोड
लागे त्यास..!!
****************
२०)
नको विसंवाद
जग सकारात
यश जीवनात
हमखास..!!
*****************
२१)
यश कृष्णकृत्यी
औट घटकेचे
जीवन काट्याचे
बाकी जान..!!
******************
२२)
यशाच्या वाट्यात
भागीदार सारे
मतलबी वारे
माणसात..!!
*****************
२३)
पचवता विष
अपयशाचे ते
दालन खुलते
यशाचे ते..!!
******************
२४)
सोडता आळस
मिळवाल यश
होईल ते वश
प्रयत्नाने..!!
******************सुनिल पवार.........

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (३)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (३)
*****************************
१३)
होवू द्या सुरेल
जीवनाचे गाणे
यशाचे तराणे
साधनेने..!!
***************
१४)
लढण्याआधी का
हरला असा तू
अपयशास तू
वरले का..!!
****************
१५)
अचूक निर्णय
नेतो यशाकडे
कशास साकडे
देवापाशी..!!
*************
१६)
नसावी मस्तकी
यशाची हवा ती
जपावीत नाती
प्रत्येकाने..!!
***************
१७)
नशा ही यशाची
गर्वास पाळते
मनास जाळते
निष्कारण..!!
***************
१८)
जपून तू टाक
प्रथम पाऊल
लागेल चाहूल
यशाची ती..!!
****************सुनिल पवार.....


II यशापयश सुधाकरी षष्ठक II (2)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (2)
*****************************
७)
व्यर्थ होती भीती
अपयशाची ती
झाले प्रयत्नांती
यश खुले..!!
**************
८)
मार्ग तो यशाचा
खडतर जरी
संयम तू उरी
राख जरा..!!
***************
९)
खचू नको मना
अपयशाने तू
बाधा आणी किंतु
यशामध्ये..!!
***************
१०)
यशापयशाचा
करू नको बाऊ
नसे ते टिकाऊ
जीवनात..!!
***************
११)
होईल सुकर
मार्ग तो यशाचा
काटा आळसाचा
दूर सार..!!
***************
१२)
प्रयत्नांचे बळ
पंखात भरावे
नभी विहारावे
यशाच्या त्या..!!
****************सुनिल पवार.........

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (१)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (१)
*************************
 १)
खचु नको तू
येता अपयश
मिळेल ते यश
प्रयत्नाने..!!
************
२)
प्रयत्नाची जोड
करील सुकर
गाठण्या शिखर
यशाचे ते..!!
*************
३)
अपयशा मागे
यश लपलेले
मज दिसलेले
प्रयत्नाने..!!
*************
४)
प्रयत्नाची कास
मनात विश्वास
गाठण्या नभास
योशोदायी..!!
*************
५)
निश्चित मनास
ना भीती कशाची
कास प्रयत्नाची
यश देई..!!
**************
६)
लंगडी सबब
झाकण्या नको ती
यशास तुझ्या ती
दूर नेई..!!
**************सुनिल पवार.....


Monday, 6 July 2015

II एक दिन ऐसा भी आयेगा II

एक दिन ऐसा भी आयेगा..

 एक दिन ऐसा भी आयेगा
बेवफा को वफ़ा से प्यार होगा..
ना मिलेगी मगर वफ़ा
ना नसीब-ए-दीदार होगा..!!


आग लगेगी दिल में मगर
ना तुम जल पाओगी
हकीकत में ना सही
मन ही मन हमें चाहोगी...!!

एहसास होगा उस दिन तम्हे
के पैसोसे प्यार नहीं मिलता..
ऐसा कभी होता अगर
हर चौराहे पर ठेला लागता..!!

आज पेहने है हार किसीके
हार तो यह पेहले से तय थी..
और किसी की नहीं सनम
यह तुम्हारे दिल की ही राय थी..!!
--सुनिल पवार..

|| तुझे येणे ||


|| तुझे येणे ||
×××××××××
तुझे येणे
झुळुक मंद वाऱ्याची..
निल नभास
साथ शुक्र ताऱ्याची..!!

तुझे चालणे
चंचल जसे हरणीचे
नेत्र सुखद
नृत्य मोहक मोरणीचे..!!

तुझे हासणे
बरसात मुक्त मोत्याची..
तृप्त मनीषा
लुब्ध राज हंसाची..!!

तुझे बोलणे
तान सुरेल कोकिळेची..
भरुन ओंजळ
गंधित फुले बकुळेची..!!

तुझे दिसणे
चंद्र तेज पोर्णिमेचे..
तुझे जाणे
मागणे तुटत्या चांदणीचे..!!
*******सुनिल पवार....
 

II मेणबत्ती II

II मेणबत्ती II
**************
छोटीशी मेणबत्ती मी
चहु दिशा उजळते मी..
माझ्याच जीवनावर
आज अशी जळते मी..!! 


हृदयी घेऊन आग मी
हिंदोळ्यावर झुलते मी..
जीवनाच्या वाटेवर
झुळूकमात्रे हेलावते मी..!!

कणखर मनाने जगते मी
क्षणा क्षणाला झिजते मी..
हृदय विशाल जसे सागर
अलवार अशी पाझरते मी..!!

आन्याये पेटून उठते मी
मूक निषेध नोंदवते मी..
पांथस्थांच्या वाटेवरची
साक्षीदार असते मी..!!
******सुनिल पवार....

Thursday, 2 July 2015

II विठू माझा लेकुरवाळा II

II विठू माझा लेकुरवाळा II
विठू माझा लेकुरवाळा
तेने लावीला मज लळा..
शामल सुंदर, रूप घननिळा 
शोभतसे गळा, तुळशीच्या माळा..!!
घेऊनीया हात, ऐसे कटीवर
निश्चल भाव, उभा विठू विटेवर..
कस्तूरी टिळा, शोभतसे भाळा
ऐसा माझा श्रीधर, दिसे लडिवाळा..!!
पाहून ते रूप, तृप्त झाले मन
कीर्तनात दंग, झाले भक्तगण..
घेतले दर्शन, याची देह डोळा
बहरून आला, माझा देहमळा..!!
विठू माझा लेकुरवाळा
तेने लावीला मज लळा..!!
--सुनिल पवार..✍️

Wednesday, 1 July 2015

|| कृषीदिन ||

|| कृषीदिन ||
×××××××××
देताय शुभेच्छा मानतो आभार
आज आहे नव्ह कृषीदिन..
पण
मी वाट बघतोय मी त्याची
त्याच्या बगैर हाय सारच दीन..!!

चातक झालय माझं मन
जसं युगे युगे वाट पाहतोय
पण
तो येळेत येत न्हाही अन
दिन माझा कोरडाच जातोय..!!

लेकरं आम्ही काळ्या आईची
सर्वस्वी त्याच्याच स्वाधीन
त्यानेच ठरवावं कसं जगावं
का व्हावं आम्ही मरणाधीन..!!

क्षिणले डोळे वाट पाहुन पर
आशेची ज्योत तेवतेय मनात
येईल तो अन होईल सफल दिन
बदलेल सारे तोच क्षणात..!!
**********सुनिल पवार....