|| नभ झुला || ××××××××× उंच झुला हा नभाचा कोणी कसा ग बांधला.. कोण देत असे झोका कुठे दोर तो बांधला..!!
सूर्य चंद्र खेळी मेळी घेती मजेत तो झोका.. संगे ग्रह लाख तारे साधतात ऐसा मोका..!!
निल नभाच्या झुल्यास मऊ ढगांचा गालीचा.. वारा देत असे झोका संगती ऋतुंच्या लीला..!!
अशी विधात्याची माया कशी जाईल ती वाया असा थाट अंबराचा उंच झुला तो नभाचा..!! *****सुनिल पवार....
No comments:
Post a Comment