Friday, 24 July 2015

|| प्रवास स्वप्नांचा ||

|| प्रवास स्वप्नांचा ||
=============
पाहिली होती मी स्वप्न काही
काढली पुन्हा आठवणीची वही
साकारली किती काही कळेना
अस्पष्ट होती नोंदीची शाई..!!


दिला ताण मनाच्या चक्षुवर
स्वप्न उमटली अलगद नजरेवर
दिवा स्वप्नच ती फार होती
पटले मनास आज खरोखर..!!

होती तशीच स्वप्न मोठी
ओंजळ मात्र पडली छोटी
तरीही धावत होतो अविरत
खुणावत होती रोजी रोटी..!!

गाठले असेल शिखर कदाचित
वाटले मनास साकारले स्वप्न
का खरच साकारले..??
उरला मागे पुन्हा तोच प्रश्न..!!

प्रवास आपल्या स्वप्नांचा
अखंड असाच चालत असतो
कुठे एका वळणावर थबकतो
अखेरचा तो श्वास असतो..!!
******सुनिल पवार...

No comments:

Post a Comment