Friday, 17 July 2015

|| मी कुठे म्हणतोय ||

|| मी कुठे म्हणतोय ||
××××××××××××××××
अहमहिका लागलीय जणू
टीका करायची
मी कुठे हो म्हणतोय
चुका करायची..??


कोण देवांवर करतोय
कोण रूढ़ी परंपरेवर
मी कुठे हो म्हणतोय
नाही बरोबर..??

त्या निमित्ताने का होईना
तो नामस्मरण करतोय
मी कुठे हो म्हणतोय
तोल ढासळतोय..??

कुणा माणासात दिसतोय
मुक्या प्राण्यात दिसतोय
मी कुठे हो म्हणतोय
देव असतोय..??

मनात तोही पूजतोय
मार्ग वेगळा धरतोय
मी कुठे हो म्हणतोय
वाईट करतोय..??

तुम्ही म्हणाल
हा असाही बोलतोय
अन तसाही बोलतोय
मी कुठे हो म्हणतोय
मी फ़क्त अनुभवतोय..!!
*****सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment