Wednesday, 29 July 2015

|| भिक नको पण ||

|| भिक नको पण ||
============
वाहतात पहा कसे
मतलबी राजकारणी वारे..
तुटतात पहा कसे
त्यांच्या अकलेचे तारे..!!

म्हणतात हे महाभाग
प्रेम करून शेतकरी मेले..
कळेना मला काही
ह्यांना मंत्री कुणी केले..!!

प्रेम करून मरायला
ते काय लैला मजनू वाटले..
बरळलात तुम्ही अन
आमचे काळीज फाटले..!!

शेंबड़ पोर ही सांगेल
पिचल्या शेतकऱ्यांच्या व्यथा..
उंटावरच्या शहाण्यांनो
कसल्या लिहतायं कथा..!!

किती सोसावं बळीराजानं
मळभ मनात रोजच दाटतं..
भिक नको पण कुत्रं आवर
आता मला म्हणावसं वाटतं
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.......

No comments:

Post a Comment