तक्रार तरी नाही...
चारी दिशेला
रखरखाट भरून राहिलेला
अन् डोळ्यातील
टिपूसही आटलेला
दुःखाच्या ओंजळीने
मी किती स्वप्न प्यालो
तरीही
घसा कोरडा पडलेला..!!
पण
हे जीवना
तक्रार तरीही नाही
शब्दांच्या बुडबुड्यात
देह अखंड बुडालेला
अन्
सहानुभूतीचा कोरडा चारा
आहे सोबतीला..
आणखी काय हवे
सांग ना
दिवस कंठण्याला..!!
**सुनिल पवार...✍️
No comments:
Post a Comment