Tuesday, 29 January 2019

भ्रमर गुज...

भ्रमर गुज...
बोले सहज भ्रमर फुलास
तू खूप सुंदर आहेस..
फुल म्हणे भ्रमराला
तू माझ्यासवे निरंतर आहेस..!!
हसला भ्रमर म्हणाला,
तुझा गंध मला वेडावतो
का बेभान करतो मनाला..
हा रंग तुझा मोहक
खेचत आणतो देहाला..!!
हसले फुल म्हणाले,
तू गंधवेडा रंगरंगीला
फिरशी घालत पिंगा..
या फुलावरून त्या फुलावर
रोज चालतो तुझा दंगा..!!
हसला भ्रमर म्हणाला
तू मिटून घे जरा पाकळ्या
मी उडणे माझे विसरून जाईन..
श्वास जरी घुसमटला देहात
मी केवळ तुझा बनून राहीन..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment