Tuesday, 29 January 2019

शून्यात शोधतो मी...

शून्यात शोधतो मी...
शून्यात शोधतो मी
संपत्ती माझी..
किती झाली आजवर
प्राप्ती माझी..!!
मिळवले किती
किती उणे केले..
गणित आयुष्याचे
तरी न सुटले..!!
हातचे राखले
पदर मोड केली..
हा एक्स तो वाय
त्यांची फोड केली..!!
गुणाकार कधी
तर कधी भागाकार..
तरीही आयुष्याला
कुठे आला आकार..!!
आयुष्याचे गणित
तसे किचकट असते
शून्यातून निपजले
शून्य बनून राहते..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment