Friday, 28 December 2018

|| दाह ||

|| दाह ||
=====
मरणकळा घेऊन येतात ऋतू
संकेत जगण्याचे ते पाळत नाहीत..
आठवणीत राहावेत असे काही
सोहळे ऋतूंचेही होत नाहीत..!!
दाह साचलेलाच दिसतो देहात
आता सूर्यही उबारा देत नाहीत..
सावलीशी जो तो फटकून वागतो
हल्ली झाडेही फारसी दिसत नाहीत..!!
अपरिहार्य व्हावी पानगळ कधी
पण दुर्दैवाने तशी होत नाहीत..
देहास बिलगलेली लोचट पाने
शिशिरासही जुमानत नाहीत..!!
काय प्रयोजन असावे सृष्टीचे
का जाणून कोणीच घेत नाहीत..
फुलं पडली जरी चितेवर
गंधाळणे तेही सोडत नाहीत..!!
***सुनिल पवार...✍🏼

Thursday, 27 December 2018

ll गुलाबी थंडी ll

🌻सुप्रभात🍁शुभ सकाळ🌻
गुलाबी थंडी
गार गार वारा..
दवबिंदुनी नटला
परिसर सारा..
कंपित काया
थरथर अधरा..
किरण देतसे
उबदार सहारा..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll गुलाबी द्वार ll


गुलाबी द्वार..

सकाळचा प्रहर
तिला गारव्याचा बहर।
सृष्टीने पांघरलेली
दाट धुक्याची चादर।
हिरव्या धारित्रीचा
ओलावलेला पदर।
पानाफुलावर सजलेली
मोत्यांची सर।
थरथरत्या अधरांचा
कंपितसा स्वर।
किरणांच्या अंगी
भरलेला ज्वर।
तनमनास स्पर्शीते
शिलट गार गार।
शिशिराने उघडले
प्रीतीचे गुलाबी द्वार।
--सुनिल पवार...

ll रंगत ll

रंगत....
ती काही क्षणापूरती येते
रंगी आपल्या रंगवून जाते..
विरहाच्या कातरवेळेपूर्वीची
ती रमणीय संध्या असते..!!
दिनकर समाधिस्त होतो
शिश नभाचे अलगद झुकते..
आकाश धरेचे मीलन होते
अन् रंगत तिच्या गाली रुजते..!!
असा रंगतो सोहळा नभात
ती कातरवेळही सरून जाते..
निल रंगाचा वर्षाव होतो
अन् निशा चांदणे लेवून येते..!!
ही रंगत अनोखी आकाशाची
मन तरंगात उमटत राहते..
चंद्र खेळतो नभी लपंडाव
अन् सागरास मग उधाण येते..!!
***सुनिल पवार...✍🏼

Wednesday, 26 December 2018

सांता

सांता....☃
पांढऱ्या शुभ्र दाढीतला सांता
आज आमच्या कॉलनीत आला..
आयाबायांचा अन् पोराटोरांचा
त्याच्या भोवती गराडा पडला..!!

मला दे, मला दे धोशा लावत
पोरांनी एकच गलका केला..
अन् प्रत्येक हातावर देता देता
सांता त्यांच्यात रंगून गेला..!!

मीही शिरलो नकळत गर्दीत
सांतासमोर हात पसरला..
मंद हसला सांता अन् म्हणाला
बेटा, बोल काय हवं तुला..??

मी सहज बोलून गेलो म्हटलं
सुख हरवलंय, मी शोधतोय त्याला..
माणुसकीशी नाळ जोडशील का पुन्हा?
निरागस बाल्य देशील का रे मला..!!

पुन्हा मंद हसला सांता म्हणाला
हे बघ मी शोधलंय माझ्या सुखाला..
आता वेळ नको घालवू,चढव तो पेहराव
उचल ती पोटली अन् लाग कामाला..!!
***सुनिल पवार..✍🏼

Monday, 24 December 2018

डोळस..?

डोळस..?
आंधळेच ते एकजात
स्वतः चाचपडत असतात
अन् 
जगास सूर्य दाखवत असतात..
ना बुडाचा पत्ता
ना खोलीचा अंदाज
तरीही हिरीरीने
गगनाची उंची मापत असतात..!!
दोन बाजू असतात नाण्याला
हे त्यांच्या गावीच नसते..
आंधळाच त्यांचा स्पर्श
अन् आंधळाच असतो हर्ष
मूर्ख लेकाचे
वर तोंड करून असाही सांगतात
की असे दोन बाजूचे नाणे
जगात कुठेच नसते..!!
***सुनिल पवार...✍️

|| बोल मनाचे ||



|| बोल मनाचे ||
==========
मन पण फार विचित्र असते. 
कधी 
फुलपाखरापरी स्वच्छंद बागडते 
तर कधी 
आपणाशीच फटकून वागते. 
तसे चित्र अगदी सुस्पष्ट असते 
तरीही मनाची अधीरता 
कळत नकळत रंगसंगती बिघडवते...!!
***सुनिल पवार...✍🏼

|| कॅनव्हास ||

|| कॅनव्हास ||
========
कॅनव्हास
पांढरा असो
किंवा काळा असो, 
चित्रकाराची निष्ठा
त्यावर
सुंदर चित्र निर्माण करते..!!
आता
पिंपळपानाचंच
उदाहरण घेऊ..
हिरवे पान
कसे डोळ्यास सुखावते..
आणि
सुकलेले पान
सहज दुर्लक्षित होते..
पण
चित्रकाराची निष्ठा,
त्या सुकलेल्या पानातही
मनमोहक रंग भरते
आणि ते पान
डोळ्यांचे पारणे फेडते..
यासाठी
आवश्यक असते
ती केवळ
निष्ठा,संयम आणि एकाग्रता..
ती ज्याच्याजवळ असेल
तो आयुष्याचं चित्रही
तितकंच सुंदर रंगवू शकेल..
अगदी
सुरकुतीदार झालं तरीही..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll चहा ll

चहा..

नित्य वाटे हवा हवा
चैतन्याचा स्पर्श नवा
ओठासमीप असावा
घोट चहाचा रुजावा..!!

रंग काजळी कडवा
दूध घालून सोडवा
साखरेतला गोडवा
घोट चहाचा रुजावा..!!

दिन असो वा चांदवा
उन्ह असो की गारवा
सर्व ऋतूंत मारवा
घोट चहाचा रुजावा..!!
--सुनिल पवार..✍🏼

ll आठवण ll

आठवण...
अवेळी येतेच असे नाही
तर कधी कधी
सोयीनेही काढली जाते..
रिकाम्या वेळेचे
अन् आठवणींचे असते
एक अनोखे नाते
म्हणूनच
वेळ जाण्यासाठीही
कोणाचीतरी
मुद्दाम आठवण काढली जाते..!!
😄सुनिल पवार...✍🏼

|| कभी तो ||

|| कभी तो ||
========
हम
चाहते नही
आप
लब्जो में बताओ
के
प्यार कितना है..
हम
चाहते है
कभी तो
दिल से जताओ
के
प्यार जितना भी है..!!
**सुनिल पवार..✍🏼

ll आईना ll

आईना...💞
दिल
आईने का नही होता
फिर भी लोग 
दिल को आईंना कहते है..
दिल
शयाद जुड भी जाये कभी
मगर
आईने अक्सर बिखर जाते है..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

ll झाड ll

झाड...🌳
किलबिलणारी पाखरं
नकळत कधी उडून जातात..
अन् सुन्या झाल्या घरट्यात
आठवणी मागे उरतात..!!
झाड गाळत राहते अश्रू
शिशिराच्या कुशीत शिरून..
अन् चरचर काळीज चिरत
पातेऱ्याचा टाहो जातो विरून..!!
एखाद दुसरं हळवं पाखरू
अधूनमधून भेटत राहतं झाडास..
अन् होत राहतो पानझडीतही
झाड बहरल्याचा आभास..!!
ऋतूंचे असे बदलणारे सोहळे
झाड निरंतर साजरे करते..
गळणाऱ्या प्रत्येक पानामध्ये
स्वप्न वसंताचे फुललेले दिसते..!!
कालचक्र असे काळाचे
कालानुरूप चालत राहते..
जाळीदार पान गळून जाते
पर्ण कोवळे त्याची जागा घेते..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll प्रवास ll

प्रवास...
छोटासा एक कवडसा
बाकी अंधार सारा भरलेला..
कुठे चाललो हेच कळेना
तरीही प्रवास हा ठरलेला..!!
न संपणाराच हा अंधार
हाती अशी कोणती मशाल..
तिमिर सरता सेरेना मनाचा
तिची सावली इतकी विशाल..!!
तरीही प्रवास हा चाललेला
जगाच्या चकव्यात फसलेला..
फिरून तिथेच घेऊन येतो
आ वासून तिमिर टपलेला..!!
आता मिटावे वाटतात डोळे
तिमिरास अंगीकारून घ्यावे..
अन् त्याचेच व्हावेत सोहळे..
आपण सर्वथा पराधीन व्हावे..!!
तेव्हाच संपेल हा प्रवास
आपल्या मुक्कामी पोहचेल..
संपलेल्या ह्या प्रवासाचा
अस्मादिक स्मृतींरज असेल..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll शिशिर ll

शिशिर....🍁
धुक्याच्या दुलाईला
मोत्यांची नक्षी..
किरण वेचण्या
निघाले पक्षी..!!
बोचऱ्या थंडीला
शेकोटी साक्षी..
शिशिर सोहळा
साठवावा अक्षी..!!
***सुनिल पवार...✍🏼
सुप्रभात🍁शुभ सकाळ

ll इच्छा ll

इच्छा...
कधी,
स्वेच्छेने मरत नसतात
खरं तर, 
त्या मारल्या जातात..
कधी,
कोणाच्या हातून मरतात
तर कधी,
स्वतःलाच माराव्या लागतात..!!

ll अरेच्चा ll

 अरेच्चा...😉
चांदण्यात न्हाऊन
एक नदी
वायूवेगे दौडत येते..
मी
आवगे पसरतो बाहू
पण
न जाणे कुठे लुप्त होते..
अचानक
डोळे उघडतात
अन् मी स्वतःशीच हसतो
म्हणतो,
अरेच्चा..!
हे तर केवळ स्वप्न होते..!!
**सुनिल पवार...✍🏼😄