Friday, 14 December 2018

|| मौन ||

|| मौन ||
======
निःशब्द तू जरी
ही रात्र बोलते आहे..
तुझ्या प्रितीचं गुज 
नकळत खोलते आहे..!!
अवखळ वाऱ्याच्या स्पर्शाने
रातराणी गंधाळते आहे..
हे मौन तुझे सूचकतेचे
मज अधिक छळते आहे..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment