Thursday, 27 December 2018

ll रंगत ll

रंगत....
ती काही क्षणापूरती येते
रंगी आपल्या रंगवून जाते..
विरहाच्या कातरवेळेपूर्वीची
ती रमणीय संध्या असते..!!
दिनकर समाधिस्त होतो
शिश नभाचे अलगद झुकते..
आकाश धरेचे मीलन होते
अन् रंगत तिच्या गाली रुजते..!!
असा रंगतो सोहळा नभात
ती कातरवेळही सरून जाते..
निल रंगाचा वर्षाव होतो
अन् निशा चांदणे लेवून येते..!!
ही रंगत अनोखी आकाशाची
मन तरंगात उमटत राहते..
चंद्र खेळतो नभी लपंडाव
अन् सागरास मग उधाण येते..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment