गुलाबी द्वार..
सकाळचा प्रहर
तिला गारव्याचा बहर।
सृष्टीने पांघरलेली
दाट धुक्याची चादर।
हिरव्या धारित्रीचा
ओलावलेला पदर।
पानाफुलावर सजलेली
मोत्यांची सर।
थरथरत्या अधरांचा
कंपितसा स्वर।
किरणांच्या अंगी
भरलेला ज्वर।
तनमनास स्पर्शीते
शिलट गार गार।
शिशिराने उघडले
प्रीतीचे गुलाबी द्वार।
--सुनिल पवार...
No comments:
Post a Comment