Friday, 14 December 2018

|| आठवणी ||

|| आठवणी ||
=========
फार विचित्र असते ना?
आठवणींचं वेळी अवेळी येणे..
कधी सुखद अनुभूती होते 
तर कधी नकळत आसवे गाळते..!!
कधी कधी वाटते
आठवणी उगाच येतात छळायला..
तर कधी कधी असंही वाटते की,
आठवणी हव्यात हळुवार पाळायला..!!
कोणत्याही पाहुणचाराची अभिलाषा न बाळगता
किंवा कोणत्याही अपमानाची तमा न बाळगता
आठवणी निरंतर येत राहतात
सुख दुःखाचे हिंदोळे घेत राहतात..!!
वर्तमानातून भूतकाळात
तसेच भूतकाळातून भविष्यात
आठवणी नकळत घेऊन जातात..
क्षण येतात आणि क्षण जातात
आठवणी मात्र निरंतर सोबत असतात..!!
***सुनिल पवार..✍🏼

No comments:

Post a Comment