Sunday, 2 December 2018

|| युवा ||

|| युवा ||
======
आजचा युवा
डोस्क्यात हवा..
भडकतय माथं
जवा तवा..!!

आजचा युवा
उत्साह नवा..
भरकटतयं तारू
मार्ग कुणी दावा..!!

आजचा युवा
वास्तववादी दिवा..
उडेल भडका
संयमाने पेटवा..!!

आजचा युवा
स्वच्छंद थवा..
छाटू नका पंख
उडणे शिकवा..!!

आजचा युवा
भविष्याचा ठेवा..
तुम्ही,आम्ही, समद्यानी
जपायला हवा..!!
***सुनिल पवार..✍🏽

No comments:

Post a Comment